मुंबई :
मनसेनं आपला पाकिस्तानविरोधी आणि रोष नेहमीच कायम ठेवला असून तो दिवसेंदिवस आणखी तीव्र होत आहे. कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्या आठवडाभरापासून संपूर्ण महाराष्ट्र विविध आंदोलनाच्या माध्यमातून पाकिस्तान विरोधात आंदोलन करत आहे. गेल्या काही दिवसांपासून पॅलेडियम मॉलमध्ये झारा ब्रँडच्या शॉपमध्ये पाकिस्तानी कपड्यांची विक्री करीत आहे हि बाब मनसेच्या कार्यकर्त्यांना समजली तेव्हा मनसे सरचिटणीस रिटा गुप्ता, विभाग अध्यक्ष नगरसेवक दत्ता नरवणकर, भूपेन जोशी आदी कार्यकर्त्यांनी लोअरपरळ येथील झारा शोरूमला धडक देऊन आज झारा ब्रँडच्या शॉपमधल्या मालाची मनसे कार्यकर्त्यांनी नासधूस केली. याअगोदरच मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी अखिल चित्रे यांनी मालाड इनॉर्बिट, फोनिक्स कुर्ला आदी झाराचे शोरूम असलेल्या मॉलमध्ये लेखी पत्राद्वारे त्यांना पाकिस्तानी कपडे न विकण्याचा इशारा दिला होता.
पाकिस्तानामध्ये तयार झालेले कपडे झारा शोरूममध्ये विक्रीस उपलब्ध असल्याची माहिती मनसे कार्यकर्त्यांकडे होती. कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत पाकिस्तान बनावटीच्या कपडे रॅकमधून फेकून देत पायदळी तुडवले. आणि संताप व्यक्त केला. पाकिस्तानमध्ये तयार झालेल्या वस्तू विकू नका, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलनाला सामोरं जायला तयार राहा, असा धमकी वजा इशारा मनसेच्या वतीने मुंबईतील सर्व मॉल्स आणि डिपार्टमेंटल स्टोअर्सच्या व्यपस्थापनाला दिला आहे.
Post a Comment