नवी दिल्ली –
वर्ष २०१९ मध्ये भाजप पुन्हा केंद्रात सत्तेत आल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारताला हिंदु राष्ट्र घोषित करील, असा दावा देहली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि सच्चर आयोगाचे प्रमुख राजेंद्र सच्चर यांनी ‘रेडिफ मेल’ या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
हिंदु राष्ट्राविषयी सच्चर पुढे म्हणाले की, योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनवणे हा यामधील सर्वांत मोठा संकेत आहे. संघाच्या योजनेचाच हा भाग आहे; मात्र या धोक्याकडे विरोधी पक्षांचे अद्याप लक्ष गेलेले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
Post a Comment