आंबेगाव, पुणे येथे ‘साधना आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या प्रवचनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे– भारतात हिंदु राष्ट्र म्हणजेच रामराज्य व्हावे, असे वाटत असेल, तर प्रत्येकाने साधना करण्याची नितांत आवश्यकता आहे. आज आतंकवाद, नक्षलवाद, इसिस यांना पुरून ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वावर आधारित हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी कटीबद्ध होऊया, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या डॉ. ज्योती काळे यांनी केले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियानां’तर्गत येथील श्री गोरक्षनाथ मठामध्ये २९ एप्रिल या दिवशी ‘साधना आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर समितीने आयोजित केलेल्या प्रवचनात त्या बोलत होत्या. या प्रवचनाचा ६० जिज्ञासूंनी लाभ घेतला.
या वेळी डॉ. काळे यांनी सांगितले की, परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘गुरुकृपायोग’ हा जलद आध्यात्मिक उन्नतीसाठी निर्माण केलेला साधनामार्ग आहे. यामुळे इतर कोणत्याही साधना मार्गापेक्षा या मार्गातून जलद आध्यात्मिक प्रगती होते. याची प्रचीती सहस्रो साधकांनी घेतली आहे. या वेळी त्यांनी राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यासाठी काय कृती करायची, तसेच हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि हिंदूसंघटन यांविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.
Post a Comment