गडचिरोली:-
जिल्हयात 152 गावे जलयुक्त करण्यात आली असून यापुढील काळात दोन हंगामी शेती शक्य व्हावी या दृष्टीकोणातून प्रयत्न शासन करीत आहे. यासाठी गडचिरोली जिल्हयासाठीच पीक युक्त शिवार कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. याचा अधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास आणि वनराज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री राजे अंम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनाचा सोहळा येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडला त्याप्रसंगी ते बोलत होते.
या मुख्य शासकीय सोहळयास जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता भांडेकर, नगराध्यक्ष योगिता पिपरे, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु गोयल, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. बिपीन इटनकर , उपमुख्य कार्यकारी अधिकारी जवळेकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सानावणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी बोलतांना ते म्हणाले की, राज्याच्या स्थापनेनंतर आजवरच्या 57 वर्षाच्या इतिहासात राज्याने आपला अव्वल क्रमांक देशात कायम राखला आहे. विभिन्न भाषा तसेच धर्म आणि पंथाच्या या राज्याला सामाजिक सेवेचा मोठा इतिहास लाभलेला आहे. राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांनी प्रेरित होवून जनतेला केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सरकार काम करीत आहे.
नागरिकांच्या दृष्टीकोणातून अत्यावश्यक अशा सेवा पुरविण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यात काम होत आहे. औद्योगिक विकासासोबतच शाश्वत कृषी विकासाचे उद्दीष्ट डोळयासमारे ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार राज्यात काम करीत आहे.
आपला हा गडचिरोली जिल्हा आदिवासी बहुल आणि वनांनी समृध्द असा जिल्हा आहे अशा या जिल्हयात धानाची एक हंगामी शेती आहे. मात्र येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक संपन्नता प्राप्त व्हावी यासाठी आता खास गडचिरोली जिल्हयासाठी कृषी समृध्दी अभियान हाती घेण्यात आले आहे. यात खरीप हंगामानंतर रब्बी हंगामातही पेरणी वाढावी या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे.

Post a Comment