“अनंताच्या पलीकडे जाऊनही
अस्तित्व आपलं सदैव उरावं.
आपल्या नंतर सुद्धा आपल्या डोळ्यांनी,
आपल्या लाडक्यांना कुणीतरी पहावं.”
जगात नेत्रदान हे एकमेव असे श्रेष्ठ पुण्यकर्म आहे जे मृत्यूनंतर पूर्ण होते. आपल्यासारख्या पुण्यात्म्यांच्या निर्जीव देहातील डोळ्यांमुळे अंध व्यक्तींचे जीवन खऱ्या अर्थाने आपण प्रकाशमय करू शकता. मृत्यूनंतर निष्क्रिय व निर्जीव शरीरातील ‘नेत्र’ या अवयवाचा सत्कारणी उपयोग केला आहे अमर- पुजा यांनी.. चांदुर रेल्वेपासुन १० कि.मी. अंतरावर असलेल्या ग्राम पळसखेड येथील पत्रकार अमर लिलाधरराव घटारे यांचा शुभविवाह अकोला येथील चि.सौ.का. पुजा पंडीतराव खउल हिच्यासोबत अमरावती येथील कमल प्लाझा येथे २१ मे, रविवारी थाटात संपन्न झाला. याच लग्नाच्या शुभमुहुर्तावर अमर - पुजा यांनी मरणोत्तर नेत्रदानाची इछा आपल्या जवळच्या नातलगांकडे व्यक्त केली. व लग्नाच्याच दिवशी जवळच्या नेत्रपेढीशी संपर्क साधून नेत्रदानासाठी आपले नाव नोंदवुन सामाजिक कर्तव्य निभावले. त्यांच्या अशा कर्तव्यामुळे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे. लग्नाच्या दिवशी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करणारे हे महाराष्ट्रातील पहिलेच नवविवाहीत जोडपे ठरले आहे एवढे मात्र नक्की.
नेत्रदान हे असे दान आहे की त्यासाठी पैशाची श्रीमंती लागत नाही. या एका दानाने दोन अंध व्यक्तींचे आयुष्य प्रकाशाने उजळून निघते ! गेलेली व्यक्ती परत येणार नसते पण त्या व्यक्तीचे नेत्र दान करून आपण दोन अंध व्यक्तींना दृष्टी देउ शकतो व त्या व्यक्तीच्या स्मृती आगळ्या प्रकारे जपू शकतो , सामाजिक दायित्व पार पाडू शकतो. एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन लोकांना दृष्टी मिळू शकते. आपल्या मरणानंतर नेत्राच्या माध्यमातून कोणीतरी जिवंत राहू शकतो, जग पाहू शकतो. आपल्यामुळे दोन दृष्टीहीनांना दृष्टी देण्याचे काम आपल्या हातून घडावे यासाठी प्रत्येकाने मरनोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला पाहिजे, असा संदेश अमर व पुजाने यावेळी दिला.
Post a Comment