बाबर, अकबर घुसखोर होते, हे मान्य केल्यास देशातील सर्व समस्या सुटतील ! – योगी आदित्यनाथ
Posted by
vidarbha
on
6:49:00 AM
in
|
लक्ष्मणपुरी –
भारतातील एकतरी मुख्यमंत्री असे बोलण्याचे धाडस करतो का ?
बाबर, अकबर हे मोगल सम्राट फक्त घुसखोर होते आणि त्यांचा भारताशी कोणताही संबंध नव्हता, हे एकदा मान्य केल्यावर देशातील सर्व समस्या सुटण्यास प्रारंभ होईल, असे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक आणि परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंह उपस्थित होते.योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की,१. महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु गोविंद सिंह हे खरे ‘हिरो’ आहेत. देशाचे खरे हिरो असलेल्या या थोर व्यक्तींचा गौरव व्हायला हवा.२. लोकांनी खऱ्यां इतिहासाचा अभ्यास करून त्यातून प्रेरणा घेतल्यास आयएस्आय, इसिससारख्या संघटनांची भीती वाटणार नाही.३. जो समाज स्वतःच्या इतिहासाचे संवर्धन करू शकत नाही, तो आपल्या भूगोलाचे संरक्षण करू शकत नाही.
Post a Comment