Thursday, May 11, 2017
अचलपूर येथे बुध्द जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा
Posted by vidarbha on 6:51:00 AM in अचलपूर / श्री प्रमोद नैकेले - | Comments : 0
अचलपूर / श्री प्रमोद नैकेले -
आज बुध्द जन्ममहोत्सव जगभर आनंदाने साजरा केला जात आहे.यानिमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या अनुषंगाने आज अचलपूर येथील गांधी पूल परिसरात असलेल्या दिक्षा भुमी येथे आकर्षक रोशनाई करण्यात आली.सकाळी सर्व बौद्ध उपासक व उपासीका मोठया संख्येने उपस्थित राहून बुध्द वंदना करून आपली आदराजंली अर्पण केली.त्यानंतर बुध्द व भिम स्तुतीपर गीतांचा सुमधूर कार्यक्रम संपन्न झाला तसेच उपस्थीत उपासक व उपासीका यांना महाप्रसाद वितरण करण्यात आले.सांयकाळी स्थानीक माळवेशपुरा येथून तथागत गौतम बुध्दांच्या शांततेचा संदेश देण्याचे उद्देशाने शहरातून शुभ्र वेश धारण करून हातामध्ये मेणबत्त्या घेऊन शांतता रँली काढली व दिक्षा भुमी येथे या रँलीचा समारोप करण्यात आला येथे बुध्द वंदना व पंचशील चे पठन करून तथागत गौतम बुद्ध यांना आपली आदराजंली अर्पण करण्यात आली.या कार्यक्रमाला बुद्ध धर्मीय बंधूभगीनींसोबत इतर धर्मीय नागरिकांनी सुध्दा मोठ्या संख्येने भाग घेतला होता. विशेष म्हणजे आजचा दिवस हा वैशाख पौर्णिमेचा हा दिवस जरी भगवान गौतम बुध्दांची जयंती म्हणून साजरा होत असला तरी या वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या जन्मास 2580 वर्ष होत आहेत तसेच सिद्धार्थ गौतम बुद्धाचा विवाह देखील वयाच्या 16 व्या वर्षी यशोधरा बरोबर झाला त्याला 2564 वर्ष होत आहेत.सिद्धार्थ गौतम बुद्ध "बुद्ध " झाले अर्थात त्याना ज्ञानप्राप्ती झाली म्हणजे त्यांनी बहुजन हिताचा कार्यक्रम बनविला त्याला 2545 वर्ष होत आहेत.
आणि गौतम बुद्धाचे महापरीनिर्वाण वयाच्या 80 व्या वर्षी झाले म्हणजे 2500 वर्ष झाले आणि त्याला आपण 2500 वे शताब्दी वर्ष म्हणून सुध्दा हा दिवस साजरा करण्यात येत आहे.अश्या प्रकारे सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या जीवनातील प्रमूख घटना वैशाख पौर्णिमेस झालेले आहेत म्हणून वैशाख पौर्णिमाचे अन्यन्य महत्व बुद्ध विचारधारेत आहे.अशा या दिनी तथागत गौतम बुद्धांचा जन्मदिन, विवाहदिन व ज्ञानप्राप्तीदिन या त्रिवेणी कार्यक्रमाचे औचित्य साधून जंयती उत्सव समिती अचलपूर व वाचनालय समिती अचलपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अचलपूर शहरात बुद्ध जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment