Thursday, May 11, 2017
जागरूक पालकांनी आज पासूनच शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारे प्रमाणपत्र मिळवण्यासठी अर्ज दाखल करावेत ...!
Posted by vidarbha on 7:00:00 AM in | Comments : 0
मित्रहो दहावी व बारावीच्या परीक्षा संपून आज दिड महिना पूर्ण झाला आहे .मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या सुरुवातीलाच निकाल लागलेला असेल. आणि विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेश घेण्यासाठी लागणारे कागदपत्रे मिळवण्यासाठी पालकांची एकच गर्दी तहसील कार्यालयात होत असते .पुढील प्रवेश घेण्यासठी विद्यार्थ्यांच्या हाती वेळ कमी असतो .एकच धावपळ सुरु होती ...पावसाळ्याची सुरुवात असल्याने वादळी वारे ...त्यातच दिवस दिवस लाईट बंद असणे....कोठेतरी खोदकामामुळे केबल तुटलेले असते त्यामुळे इंटरनेट दिवस दिवस बंद असते....कधी साईट चा त्रास राज्यभर एकाच वेळी प्रमाणपत्र मिळवण्याची पालकांची एकच घाई त्यात राज्य सरकारच्या सर्वर वर लोड आल्याने सर्वर कधी कधी चार-पाच तास बंदच असते ....विद्यार्थायंची अर्ज दाखल करताना कागदपत्रांची पूर्तता राहत नाही ...महा ई -सेवा केंद्रात व तहसील कर्मचाऱ्यावर प्रचंड तान-तणाव ....केंद्राची इच्छाशक्ती असून हि पालकांना वेळेवर प्रमाणपत्र देता येत नाही .यामुळे पालकांचा वेळ खर्च होतो .यामुळे समजदार ,हुशार व जागरूक पालकांनी आज पासूनच महा ई-सेवा केंद्र व तहसील कार्यालय नांदगाव खंडेश्वर येथे प्रमाणपत्र मिळवण्यासठी अर्ज दाखल करावेत यामुळे वेळ ,श्रम वाचेल व सर्वांवरच मानसिक तणाव येणार नाही .जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना तहसील रहिवाशी ,तहसील उत्पन्न ,वय अधिवास प्रमाणपत्र काढावेच लागते.याशिवाय OBC,SC,ST,NT या जात प्रवर्गात असलेल्या विद्यार्थांना जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र घ्यावेच लागते.अधिक माहितीसाठी महा ई-सेवा केंद्र व तहसील कार्यालयात संपर्क साधावा हि विनम्र विनंती ...!
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment