BREAKING NEWS

Friday, May 12, 2017

चांदुर रेल्वेत रावसाहेब दानवेंच्या प्रतिमेला चपलांनी तुडवले-शिवसेनेचा निषेध

चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )-



तूर खरेदी संदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नुकत्याच केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ चांदुर रेल्वेच शिवसेनेतर्फे बस स्थानक परीसरात दानवे यांच्या प्रतिमेला चपला - जोड्यांनी तुडविण्यात आले.
        तूर खरेदी संदर्भात शेतकऱ्यांबद्दल रावसाहेब दानवे यांनी नुकतेच आक्षेपार्ह विधान केले होते. त्याचे पडसाद चांदुर रेल्वे शहरात  उमटले. यावेळी तालुक्यातील शिवसैनिकांनी तालुका प्रमुख राजेश निंबर्ते यांच्या नेतृत्वात दानवे यांच्या प्रतिमेला चपला- जोड्यांनी तुडवुन त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी राजेश निंबर्ते यांच्यासह स्वप्निल मानकर, बंडु आंबटकर, मोरेश्वर आंबटकर, त्रिलोकचंद मानकानी, कौस्तुभ खेरडे, अनुप डुबे, गजानन बोबडे, विशाल देशमुख, हेमंत हटवार, विजय जयसिंगपुरे, सुमित गायकवाड, पठाण आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती..

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.