Friday, May 12, 2017
त्या दोघांची ओळख पटली - मालखेड तलावातील बुडालेले दोघे बापलेक मनोरूग्ण मुलाच्या उपचारासाठी सावंगा विठोबा आले होते
Posted by vidarbha on 10:21:00 AM in चांदूर रेल्वे / शहेजाद खान - | Comments : 0
चांदूर रेल्वे / शहेजाद खान -
तालुक्यातील सावंगा विठोबा येथील मालखेड तलावात बुडून एका इसमाचा व युवकाचा मृत्यू
झाल्याची घटना दुर्दैवी घटना बुधवारी(ता.१०)च्या सायंकाळी उघडकीस आली होती. त्या
दोघांची ओळख पटली असुन ते दोघे बापलेक असून चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगा विठोबा
येथे आपल्या मनोरूग्ण मुलावर उपचार करण्यासाठी आले होते.
मृतक मोरेश्वर बापुराव माहूरे (वय ५५) वडिल असुन मृतक शाम मोरेश्वर माहूरे(वय २५) असे
त्यांच्या मुलाचे नाव आहे. दोघेही माढळी ता.वरोरा जिल्हा चंद्रपुर येथील रहिवाशी आहेत.
ते चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगा विठोबा येथील अवधुत बुवा देवस्थानात मनोरूग्ण मुलाच्या
उपचार करीता आले होते.येथे सव्वा महिणा उपवास केल्याने मनोरूग्ण बरे होतात अशी त्याची
श्रध्दा होती.दोघे बापलेक दररोज सावंगा विठोबा येथील तलावावर आंघोळीला जात होते.
अशातच आंघोळ करतांना मनोरूग्ण युवक पाण्यात पडला व त्याला वाचवितांना वडिलांचा
व मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला असावा असा अंदाज चांदूर रेल्वे पोलीसांनी व्यक्त केला
आहे.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार ब्रम्हदेव शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलीस
उपनिरीक्षक फुलेकर करीत आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment