सोमवारपेठ, कर्नाटक येथील हिंदु धर्मजागृती सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद
व्यासपिठावर उपस्थित डावीकडून सौ. सिंधु नवीन, कु. भव्या गौडा, दीपप्रज्वलन करतांना श्री. प्रमोद मुतालिक, अधिवक्ता अभिमन्यू कुमार आणि श्री. मोहन गौडा
सोमवारपेठ (जिल्हा कोडगु, कर्नाटक) – हिंदु धर्म हा एकमेव धर्म आहे जो सर्वांना सुखी ठेवण्याची शिकवण देतो आणि तरीही ख्रिस्ती आणि मुसलमान हिंदु धर्मावर टीका करतात. मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यासाठी जगात अनेक देश आहेत; मात्र हिंदूंसाठी केवळ भारतच आहे. देशाच्या रक्षणासाठी आपण कठोर पावले उचलायला हवी. आपल्या सैन्यदलावर आक्रमण करणार्यांना धडा शिकवण्याची आवश्यकता आहे, असे मत श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी येथे बोलतांना व्यक्त केले. कर्नाटकच्या कोडगु जिल्ह्यातील सोमवारपेठ शहरात नुकतीच हिंदु धर्मजागृती सभा पार पडली. या वेळी ते बोलत होते. या सभेला स्थानिक हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता अभिमन्यू कुमार, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मोहन गौडा, समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या कु. भव्या गौडा आणि सनातन संस्थेच्या सौ. सिंधु नवीन यांनी मार्गदर्शन केले. या धर्मजागृती सभेला ३०० धर्माभिमानी उपस्थित होते. यामध्ये आमदार आपाचु रंजन यांचाही समावेश होता.
Post a Comment