BREAKING NEWS

Thursday, June 8, 2017

निमगव्हाण ग्रामपंचायत 'रामभरोसे' ........ निमगव्हाण ग्रामपंचायतचा कारभार चालतो सरपंच - उपसरपंचा शिवाय

चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )

आज दिवसा गणिक ग्रामीण भागासाठी शासन नवनवीन योजनांची घोषणा करीत असून गावे सुजलाम - सुफलाम कशी होईल, या बाबींवर भर देण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु अमरावती जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जिल्ह्यातील निमगव्हाण येथे सरपंच व उपसरपंच नसल्यामुळे गावाची विकासात्मक कामे ठप्प झालेली दिसत असून तालुक्यातील अधिकार्‍यांसह लोकप्रतिनिधी मात्र ह्या बाबींकडे लक्ष देण्यास असर्मथ दिसत आहे.      जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील निमगव्हाण हे १५०० लोकसंख्येचे गाव असून येथे ७ सदस्यीय ग्रामपंचायत आहे. परंतु येथील उपसरपंच उत्तमराव इंगळे यांचे एक वर्षापूर्वी निधन झाले. आणि सरपंचा सपना संजय आंबटकर यांची सुध्दा एक वर्षापासून प्रकृती बरोबर नसल्यामुळे त्या सुध्दा गावात राहत नव्हत्या आणि गेल्या १ मे ला महाराष्ट्र दिनी निमगव्हाण ग्रा.पं.च्या आमसभेत तेथील नागरिकांनी खूप धिंगाणा घातला व शेवटी सरपंचा आंबटकर यांना राजीनामा देण्यास भाग पाडले आणि आता येथे सरपंच - उपसरपंच ही दोन्ही पदे रिक्त आहे. उपसरपंच उत्तमराव इंगळे यांच्या निधनामुळे एका सदस्याची निवडणूक झाली. परंतु उपसरपंचाची निवडणूक सुध्दा झाली नाही. एका वर्षापासून रामभरोसे चालणार्‍या कारभाराला गावकरी कंटाळले असून विकास कसा झाला आहे. येथे सचिव म्हणुन रश्मी कडावे या कार्यरत आहे. जर निर्णय घेणारे लोकप्रतिनिधीच जर हजर नाही / अस्तित्वात नाही तर मग निर्णय कोण घेणार ? या ग्रामपंचायतमध्ये काँग्रेस, जनता दल, भाजपाची सत्ता असली तरी सध्या या १५०० लोकसंख्येच्या गावाच्या विकासासाठी किंवा लोकप्रतिनिधी नसल्यामुळे गाव कुठे चालले ह्याकडे तालुक्यातील अधिकारी, लोकप्रतिनिधी यांचे मात्र पूर्णत: दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसत आहे.
सरपंच - उपसरपंच विना चाललेल्या कारभाराला गावकरी कंटाळले असून त्वरीत सरपंच यांच्या रिक्त झालेल्या पदासाठी मतदान घ्यावे तसेच उपसरपंचाची सुध्दा निवडणुक तत्काळ घ्यावी, जेणेकरून गावाचा विकास होईल, अन्यथा भविष्यात फार मोठय़ा आंदोलनाच्या पावित्र्यात गावकरी असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.