BREAKING NEWS
Showing posts with label महेंद्र महाजन जैन / रिसोड -. Show all posts
Showing posts with label महेंद्र महाजन जैन / रिसोड -. Show all posts

Friday, May 19, 2017

ऊर्जामंत्र्यांची धडक कारवाई, जनता दरबारातच अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या.



महेंद्र महाजन जैन / रिसोड -

राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाशिम मध्ये जनता दरबारात अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या. काल (18 एप्रिल) त्यांनी वाशिमच्या वीज वितरण कार्यालयाच्या प्रांगणात ‘जनता दरबार’ आयोजित केला. त्यावेळी त्यांनी ही कारवाई केली.जनता दरबारात तब्बल  200 तक्रारी आल्या. ज्यात शेतकऱ्यांच्या तक्रारीअधिक होत्या. पैसे दिल्या शिवाय महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी काम करत नाही, असा आरोप यावेळी अनेकांनी केला. त्यानंतर तक्रारींवर कारवाई करत तीन अधिकारी आणि एक वरिष्ठ लिपिकाला नोटीस देऊन त्यांची तातडीने गडचिरोलीला बदली केली, तर 4 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यास सांगितलं आहे.दरम्यान, चारही अधिकाऱ्यां विरोधात पोलिसात तक्रार दाखल करा, अशी सूचना ऊर्जामंत्र्यांनीच तक्रारदारांना केली. ऊर्जामंत्र्यांच्या या धडक कारवाई मुळे जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Friday, May 5, 2017

सेनगांव भाजपा युवामोर्चा पदाधिका-यांनी घेतली लोणीकर यांची भेट


महेंद्र महाजन जैन / रिसोड -



सेनगांव:- सेनगांव तालुक्यासह हिंगोली जिल्ह्यातील भाजपा युवामोर्चा कार्यकर्त्यांनी नुकतीच भाजपा युवानेते राहुलभैया लोणीकर यांची भेट घेऊन त्यांना सेनगांव व हिंगोली तालुक्यातील भाजपा युवामोर्चा शाखा स्थापनेसाठी आमंत्रीत केले.
सेनगांव व हिंगोली जिल्ह्यातील भाजपा युवामोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नुकतीच परतुर जि.जालना येथे जाऊन नामदार बबनराव लोणीकर पाणीपुरवठा मंत्री यांचे चिरंजीव भाजपा युवानेते राहुलभैया लोणीकर यांची भेट घेऊन त्यांना सेनगांव तालुक्यासह हिंगोली जिल्ह्यातील भाजपा युवामोर्चा शाखा स्थापने करीता आमंत्रीत केले आहे. यावेळी भाजपा युवानेते शिवाजीराव मुटकुळे, अनिल अगस्ती, हरीदास नरवाडे, नारायण कोटकर, बडु कराले, विजय ढोकळे, दिपक मगर आदीसह भाजपा युवामोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मारवाडी युवा मंच तर्फे आंतरराष्ट्रीय फायरफायटर्स डे संपन्न



महेंद्र महाजन जैन / रिसोड -


वाशीम :दर वर्षी 4 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय फायर फायटर्स दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रमच वाशीम नगरीत मारवाडी युवा मंच तर्फे हा दिवस साजरा केला गेला. सदर कार्यक्रमात

मारवाडी युवा मंच च्या सर्व सदस्यांनी अग्नीशामक दलाच्या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला व त्यांच्या सेवाकार्या बद्दल गौरव करुन त्यांना सन्मानीत केले. सदर कार्यक्रमाला मारवाडी युवा मंच चे अध्यक्ष मनिष मंत्री, सचिव संजोग छाबडा, कोषाध्यक्ष उमेद खंडेलवाल, सदस्य सौरभ गट्‌टाणी, रोशन बाहेती, प्रेमचंद अग्रवाल, पुनित शर्मा, ओम बनभेरु आणि इतर सदस्य उपस्थित होते. सदर कार्यक्रमात बोलतांना अग्नीशमन दलाचे  दिनकर सुरोशेे यांनी माहिती दिली की, अग्नीशमन दलाचा टोल फ्रि फोन क्र. 101 हा  लावला असता तो फोन अकोला येथील नियंत्रण कक्षाला जातो व तेथुन वाशिम कक्षाला सुचना देण्यात येते. या काळात होणारे नुकसान जेवढ्‌या लवकर टाळता येईल तेवढया लवकर सुचना मिळत नाही ज्यामुळे जनतेस असुविधा होते. मारवाडी युवा मंच च्या सदस्यांनी या अडचणीवर तोडगा काढण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरवठा करुन जनतेच्या या महत्वपूर्ण प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याचा विडा उचलला आहे. या कार्यक्रमात अग्नीशामन दलाच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांना भेट स्वरुपात सन्मानचिन्ह व मिल्ट्री कॅपचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात अग्नीशमन विभागाचे ड्राव्हर कम ऑपरेटर दिनकर सुरोशे, उप अग्नीशामन अधिकार  दिनेश माकोडे,  अनुजकुमार , ड्रायव्हर विजय कुळकर्णी, फायरमॅन विजय काल्हे, शैलेंद्र चंदेल, गणेश  शिदे, कल्पक डोळस, विठ्‌ठल ठोंबर आदी कर्मचाऱ्यांची उपस्थिती लाभली.

Saturday, April 29, 2017

सार्वजनिक बुध्द जयंती निमित्त शनिवारी बैठक



महेंद्र महाजन जैन / रिसोड -

वाशीम - येत्या बुधवार, 10 मे रोजी बुध्द जयंतीच्या नियोजनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने शनिवार, 29 एप्रिल रोजी स्थानिक रेखाताई राष्ट्रीय कन्या शाळेमध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर बैठकीत बुध्द पोर्णिमेनिमित्त शहरात घेण्यात येणार्‍या कार्यक्रमाविषयी चर्चा, नियोजन याविषयी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल. सोबतच 14 एप्रिलला जयंती कार्यक्रमामध्ये मिरवणूकीव्दारे उत्कृष्ट समाजप्रबोधन करणार्‍या मंडळाची निवड करुन या मंडळाला बुध्द जयंतीच्या दिवशी प्रोत्साहनपर स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. तरी सदर बैठकीस समाजबांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने माजी आमदार भिमराव कांबळे, तेजराव वानखेडे, मधुकर जुमडे, ऍड. संजय इंगोले, परमेश्‍वर अंभोरे, अनंत तायडे, जग्गु राऊत, डॉ. रमेश वानखेडे, डॉ. सहदेव चंद्रशेखर, अरविंद उचित, सुनिल कांबळे, जय वानखेडे, शेषराव मेश्राम आदींनी केले आहे.

Friday, April 28, 2017

स्वामी विवेकानंद संस्थेचे कार्य जिल्हयात उत्कृष्ट


महेंद्र महाजन जैन / रिसोड -


वाशीम - सामाजीक कार्यात आपल्या ठसा उमटविणार्‍या स्वामी विवेकानंद बहूउद्देशिय संस्थेच्या सर्व पदाधिकार्‍यांच्या कार्याची दखल शासनाने घेवून त्यांना पुरस्काराने गौरविले आहे. जिल्हयात स्वामी विवेकानंद संस्थेचे कार्य उत्कृष्ट असून संस्थेने आपले हे कार्य उत्तरोत्तर पुढे नेवून तळागाळातील वंचितांच्या विकासासाठी कार्य केले पाहीजे असे प्रतिपादन कारंजा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी केले.
    शिरपूर येथील स्वामी विवेकानंद संस्थेला शासनाचा सन 2015-16 चा राज्यस्तरीय युवा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थेच्या पदाधिकार्‍यांचा स्थानिक पाटणी यांच्या जनसंपर्क कार्यालयात आ. पाटणी यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलतांना आ. पाटणी म्हणाले की, युवकांनी सहकार भावनेतून एकत्र येवून संस्थेच्या माध्यमातुन क्रीडा, सामाजीक, पर्यावरण व इतर अनेक क्षेत्रात केलेले कार्य उत्कृष्ट असून या युवकांच्या कार्याचा आदर्श इतरांनी घेणे गरजेचे आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अमोल देशपांडे यांचा पाटणी यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. या सत्कार कार्यक्रमाला अरुण शेळके, प्रा. सुनिल काळे, प्रा. आर.टी. ब्राम्हण, विनोद जाधव, धनंजय रणखांब, रामेश्‍वर काटेकर, संतोष खरात, परेश व्यवहारे, सुरेश शिंदे, आकाश भारसाकळ आदींची उपस्थिती होती.

Wednesday, April 26, 2017

तुम्ही असे केले नाही तर एक जुलै पासून रिजेक्ट होईल पॅनकार्ड

 महेंद्र महाजन जैन / रिसोड -



तुम्ही 1 जुलै पूर्वी आपले आधारकार्ड पॅन कार्डाशी लिंक नाही केले तर तुमचे पॅनकार्ड रिजेक्ट होऊ शकते. अशा स्थितीत तुम्ही चालू आर्थिक वर्षातइन्कम टॅक्स रिटर्न भरू शकणार नाही. आता यापुढे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आधारकार्ड आणि पॅनकार्ड दोन्ही आवश्यक होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने १ जुलै 2017 पर्यंत सर्व पॅनकार्ड धारकांना आपले पॅनकार्ड आधारला लिंक करण्याचे आदेश दिले आहे.  दरम्यात आधार कार्डाशी पॅनकार्ड लिंक करण्यात अनेक व्यक्तींना अडचण निर्माण होत आहे. अशा व्यक्ती ज्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये काही चुका आहेत. अनेक व्यक्ती आपल्या नावाचे स्पेलिंग वेगवेगळ्या पद्धतीने लिहितात. त्यामुळे पॅनकार्ड वरील नावाचे स्पेलिंग आधारकार्डावरील नावाचे स्पेलिंगशी जुळले नाही तर असे कार्ड लिंक होत नाही. तसेच बँक खात्यातील नावाचे स्पेलिंग आणि आधारकार्डावरील नावाचे स्पेलिंग यात साम्य नसेल तर आधार आणि पॅन कार्ड लिंक होणार नाही. पॅनकार्ड, आधार कार्ड आणि बँक खात्यात दिलेली माहिती मॅच व्हायला हवी. असे नाही झाल्यास तुम्ही आपल्या पॅनकार्ड आणि आधारकार्डात बदल करण्यासाठी अर्ज करू शकतात. हा अर्ज इन्कम टॅक्स खात्याच्या वेबसाईटवर दिलेल्यालिंकवर करता येणार आहे. तसेच आधार कार्डातील माहितीतील बदल करण्यासाठी यूआयडीला आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा लागेल. तसेच यासाठीऑनलाइन अर्जही करू शकतात. सध्या देशात 24.37 कोटी पेक्षा अधिक पॅनकार्ड आहेत. तसेच 113 कोटी पेक्षा अधिक जणांनी आधारकार्ड बनविले आहे. यातील केवळ 2.87 कोटी लोकांनी 2012-13 दरम्यान टॅक्स रिटर्न जमा केले आहे. यात 2.87 कोटी नागरिकांमध्ये 1.62 कोटी लाकांनी टॅक्स रिटर्न जमा केले पण टॅक्स म्हणून एक रुपया पण जमा केलेला नाही. मोठ्या संख्येत लोक टॅक्स चोरी करतात किंवा टॅक्स देणे टाळतात. त्यामुळे इन्कम टॅक्स खात्याने रिटर्न भरण्यासाठी आधार लिंकिंग आवश्यक केली आहे. लिंकिंगनंतर टॅक्स चोरी थांबविणे शक्य होणार आहे.

Monday, April 17, 2017

सेनगांवच्या भावना खाडे ची महाराष्ट्र सिनियर महिला हाँकी टिममध्ये निवड



महेंद्र महाजन जैन / रिसोड -


सेनगांव:- शहरातील प्रसिध्द व्यापारी सतिष खाडे यांची कन्या भावना खाडे हिची राष्ट्रीय हाँकी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या सिनियर महिला हाँकी टिममध्ये निवड झाली आहे ह्या स्पर्धा दि.२० एप्रिल २०१७ ते २५ एप्रिल २०१७ ला रोहतक (हरीयाणा) येथे होणार आहेत.
क्रिडा प्रबोधनीत मिळालेल्या प्रवेशाच्या संधीचे सोने करीत हाँकी खेळात उल्लेखनीय कामगिरी करुन सेनगांवच्या भावना खाडे हिने राज्य, देशपातळीवर चमकदार कामगिरी केली आहे. माघील सात वर्षात तिचा यशाचा आलेख चढताच राहीला सेनगांव सारख्या दुर्गम भागातील मुलगी वयाच्या १६ व्या वर्षी क्रिडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करु शकते हि तिने दाखवुन दिले. इयत्ता चौथी पर्यंत सेनगांव येथील जिल्हा परीषद शाळेत शिक्षण घेणार्या भावना खाडे हिने क्रीडा प्रबोधनीत प्रवेश मिेळवला शालेय वयापासुन हाँकीमध्ये करीअर करण्याचा चंग बांधलेल्या भावना खाडे हिने पुणे येथील प्रसिध्द हाँकीपटु अजित लाकरा व कोच आरती हळगली यांच्याकडे प्रशिक्षण घेऊन अपार मेहनत व जिद्दीच्या जोरावर जिल्हास्तरापासुन राज्य व देश पातळीवर यशस्वीपणे मजल मारली आहे. याच उल्लेखनिय कार्याच्या जोरावर भावना खाडे हिची राष्ट्रीय हाँकी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या सिनियर महिला हाँकी टिममध्ये निवड झाली आहे. यापुर्वी भावना खाडे हिने २०१४ च्या चार राष्ट्रीय स्पर्धामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनीधीत्व केले आहे. जवाहरलाल नेहरु हाँकी स्पर्धेत १९ वर्षाखालील संघात संघ व कर्णधार म्हणुन उल्लेखनिय कामगिरी केली आहे. कर्नाटक चित्रदुर्ग येथे झालेल्या महिलांच्या खुल्या हाँकी संघात प्रतिनिधीत्व केले तर दिल्ली येथील राष्ट्रीय शालेय स्पर्धेत १९ वर्षाखालील संघाचे कर्णधार पद भुषविले आहे. पुर्वी भावना खाडे हिची २०१० मध्ये १४ वर्षाखालील महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली. पंजाब येथील शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदविला त्यानंतर हरियाणा येथील राष्ट्रीय स्पर्धात प्रतिनीधीत्व केले तर २०१३ मध्ये राष्ट्रीय हाँकी स्पर्धेत महाराष्ट्र सब ज्युनियर हाँकी संघाचे कर्णधार पद भुषवित उपविजेते पद मिळविले. भावना हिला बेस्ट मिड प्लेयर आँफ द टुर्नामेंट ( नेहरु कप पुणे), बेस्ट प्लेयर आँफ द टुर्नामेंट ( जैन चषक जळगांव) हे महत्वाचे पुरस्कार मिळालेत भावना सध्या बि.काँम च्या प्रथम वर्षात पुणे येथील माँर्डन काँलेजला शिकत आहे. तिच्या या यशाबद्दल वडील सतिष खाडे तेज न्युज हेडलाईन्स च्या प्रतिनीधीशी म्हणाले की, मुलीची प्रगती बघुन मला खुप आनंद होत आहे माझी मुलगी भावना हिने देशाचे नाव जगाच्या नकाशावर उंचवावे हिच अपेक्षा असल्याचे सांगितले. भावना खाडे हिची राष्ट्रीय हाँकी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या सिनियर महिला हाँकी टिममध्ये निवड झाल्याने सेनगांव तालुक्यातुन अंभिनंदन होत आहे. भावना खाडे हिचे तेज न्युज हेडलाईन्स च्या वतीनेसुध्दा खुप खुप अभिनंदन व पुढील कार्यास खुप खुप शुभेच्छा.

Wednesday, April 12, 2017

जिंतुर तालुक्यातील संक्राळा येथे अनोखा शिवविवाह - विवाह दरम्यान थोर महात्म्यांना दिली मानवंदना

महेंद्र महाजन जैन / रिसोड -




जिंतुर तालुक्यातील संक्राळा येथे पारंपरिक अनिष्ट रूढी परंपराना फाटा  देत रविवार ९ एप्रिल रोजी आगळावेगळा शिवधर्म पद्धतीने सोहळा संपन्न झाला असून नव वधुवरांनी विवाह दरम्यान थोर महात्म्यांना मानवंदना करून आधुनिक विवाह सोहळयाचे थाटात संपन्न झाला.
          अनिष्ट रूढी परंपराना झुगारून शिवधर्म पद्धतीने अंधश्रद्धा झुगारून विज्ञानवादी दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवुन  तालुक्यातील संक्राळा येथे शिवमती पुजा व शिवश्री विठ्ठल यांचा हा पारंपारीक  पद्धतीने न करता शिवधर्म पद्धतीने संपन्न झाला.
या शिवविवाह सोहळ्यात अक्षदा ऐवजी फुले उधळून व पारंपारीक मंगल आष्टके झुगारून स्त्री भृण हत्या,  बळीराजा यावर आधारित शिवाष्टके घेण्यात आली.
 शिवभक्त गंगाधर महाराज कुरूंदकर यांच्या हस्ते हा शिवविवाह सोहळा संपन्न झाला. सुरवातीस राजमाता जिजाऊ, जगद्गुरू तुकाराम महाराज ,छत्रपति शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेच पूजन करून जिजाऊ वंदना घेण्यात आली व शिवविवाह सोहळ्यास  प्रारंभ झाला. या शिवविवाह सोहळ्यासाठी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडने पुढाकार घेतला व सर्कल प्रमुख अजित पवार ,दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा शिवविवाह सोहळा संपन्न झाला. यापुढील विवाह हे अंधश्रद्धेला झुगारून शिवधर्म पद्धतीने  साजरे केले जातील अशी ग्वाही संभाजी ब्रिगेड सर्कल प्रमुख अजित पवार यांनी दिली. या शिवविवाह सोहळयात  संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे, शिवभक्त गंगाधर महाराज, जिल्हाअध्यक्ष संभाजी ब्रिगेड शिवाजीराव कदम, मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष प्रभाकर लिखे, बालाजी शिंदे तालुकाअध्यक्ष संभाजी ब्रिगेड, शहराध्यक्ष बाळासाहेब काजळे, गनेश पाटील ,मेघना  बोर्डीकर, बाळु घुगे, राजेभाऊ घुगे आदिंची उपस्थीत होती. या शिवविवाहाचे परीसरात सर्वत्र कौतुक होत आहे. हा शिवविवाह सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी   राजेश पवार,  अमोल पवार, भागवत पवार, अरून पवार व समस्त संभाजी ब्रिगेड मित्र मंडळीने व गावकरी मंडळीने सहकार्य केले

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.