Friday, May 19, 2017
ऊर्जामंत्र्यांची धडक कारवाई, जनता दरबारातच अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या.
Posted by vidarbha on 8:03:00 PM in महेंद्र महाजन जैन / रिसोड - | Comments : 0
महेंद्र महाजन जैन / रिसोड -
राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाशिम मध्ये जनता दरबारात अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या. काल (18 एप्रिल) त्यांनी वाशिमच्या वीज वितरण कार्यालयाच्या प्रांगणात ‘जनता दरबार’ आयोजित केला. त्यावेळी त्यांनी ही कारवाई केली.जनता दरबारात तब्बल 200 तक्रारी आल्या. ज्यात शेतकऱ्यांच्या तक्रारीअधिक होत्या. पैसे दिल्या शिवाय महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी काम करत नाही, असा आरोप यावेळी अनेकांनी केला. त्यानंतर तक्रारींवर कारवाई करत तीन अधिकारी आणि एक वरिष्ठ लिपिकाला नोटीस देऊन त्यांची तातडीने गडचिरोलीला बदली केली, तर 4 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यास सांगितलं आहे.दरम्यान, चारही अधिकाऱ्यां विरोधात पोलिसात तक्रार दाखल करा, अशी सूचना ऊर्जामंत्र्यांनीच तक्रारदारांना केली. ऊर्जामंत्र्यांच्या या धडक कारवाई मुळे जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment