Friday, May 19, 2017
सकारात्मक विचारामुळे श्रेष्ठ कार्य शक्य ----- ब्रह्मा कुमारी ज्योती दीदी
Posted by vidarbha on 8:02:00 PM in रिसोड / महेंद्र महाजन जैन/- | Comments : 0
रिसोड / महेंद्र महाजन जैन/-
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय शाखा रिसोड च्या वतीने व डॉ राधेश्यामजी लढ्ढा यांच्या सहकार्याने लोणी ता रिसोड येथे सात दिवसीय (दि १५मे ते २१मे ) राजयोग शिबिराचे आयोजन केले आहे. राजयोग शिबिराच्या पहिल्या दिवशी राजयोगिनी ब्रह्माकुमारी ज्योतीदीदी यांनी उपस्थितांना आपल्या प्रवचनातुन मार्गदर्शन केले.लोणी येथील सत्यनारायण मंदिरात संपन्न होत असलेल्या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी प्राचार्य कल्याण महाराज जोशी, सरपंच अशोक सानप, राजयोगिनी ब्रह्माकुमारी ज्योती दीदी, डॉ राधेश्यामजी लढ्ढा, अशोक निचळ,भागवत घुगे, इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून डॉ प्रवीण लढ्ढा यांनी सर्व मान्यवराचा यथोचित सत्कार केला.प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय करीत असलेल्या कार्याची माहिती गायत्री कोठारीने स्पष्ट केली अध्यात्मिक क्षेत्रात केवळ महिलांच्या मदतीने ज्ञान दान करणारी जगातील एकमेव संस्था म्हणून मागील ८० वर्षांपासून कार्य करीत आहे.हजारो शाखांच्या माध्यमातून सेवाकार्य निरंतर सुरू आहे.रिसोड तालुक्यातसुद्धा संस्थेचे कार्य संचालिका ज्योती दिदिंच्या मार्गदर्शनाखाली अश्व गतीने सुरू आहे. पहिल्या दिवशीच्या प्रवचनात ज्योती दीदींनी शिबिराची उद्दिष्ट्ये,गरज व आजची सामाजिक स्थिती याविषयी सविस्तर व सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.
सकारात्मक विचारामुळेच कोणतेही श्रेष्ठ कार्य करणे शक्य आहे तर नाकारात्मक व व्यर्थ विचार जीवनालाच व्यर्थ करून टाकतात परंतु त्यांचा प्रभाव मनुष्याच्या मन बुद्धीवर होऊन तनाव व नैराश्य वाढीस लागते राजयोगाच्या ज्ञाना ने आत्मिकओळख होते व आपले कर्म योग्य दिशेने होतात. ईश्वरीय विद्यालयातुन योग्य ज्ञान संकलित करून आपण सर्व ईश्वराला अपेक्षीत जीवन जगणे सहज शक्य होते.शिबिराला अबाल वृद्धधांची संख्या उल्लेखनीय आहे. शिबिराच्या यशस्वीते करिता नागप्पा चौरे ,धीरज आवारे, डॉ प्रवीण लढ्ढा इत्यादिनी परिश्रम घेतले.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment