BREAKING NEWS

Thursday, April 21, 2016

ई-लर्निगमुळे राज्याला अभिमान वाटावा असे विद्यार्थी घडतील --- ना.सुधीर मुनगंटीवार बफर क्षेत्रातील 47 शाळामध्ये इ-लर्निग शुभारंभ बफर मधील सर्व गावांचा सुक्ष्म विकास आराखडा तयार करा

*प्रविण गोंगले / चंद्रपूर / * - 





इ-लर्निग सध्याच्या काळाची गरज असून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जिल्हा परिषदेच्या 47 शाळांमधील 99 वर्ग खोल्यात डॉ.श्यामाप्रसाद मुखर्ली जन-वन योजनेअंतर्गत  ई-लर्निग सुविधा प्राप्त करुन देण्यात आली असून या आधुनिक शिक्षण प्रणालीमुळे राज्याला अभिमान वाटावा असे विद्यार्थी घडतील असे प्रतिपादन पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

मोहुर्ली येथे आज बफर क्षेत्राच्या वतीने जिल्हा परिषदेच्या 47 शाळांच्या ई-लर्निग वर्गाचा शुभारंभ पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकार, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक तथा मुख्य वनसंरक्षक जे.पी.गरड, उपसंचालक बफर झोन गजेंद्र नरवणे, उपसंचालक कोअर ए.एस.कळसकर व हरीष शर्मा यावेळी उपस्थित होते.

संगणकाव्दारे क्लिक करुन पालकमंत्री यांनी ई-लर्निंग पध्दतीचा शुभारंभ केला. जंगल हे वरदान असून ताडोबा जगाच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. या क्षेत्रातील गावांचा पर्यटन स्थळ म्हणून विकास व्हावा यासाठी प्रयत्न केल्या जात आहे. पर्यटनाचे क्लस्टर निर्माण करण्यात येईल असे ते म्हणाले.  ग्रामीण पर्यटनाला वाव देण्यासाठी निर्णय घेण्यात येतील असे त्यांनी सांगितले. 12 हजार 665 संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांचे संगणीकरण करण्यात येणार असून त्यामध्ये 15 हजार 500 गावांचा समावेश करण्यात येणार आहे.

बफर क्षेत्रातील गावे आदर्श करण्याचा संकल्प करा असे आवाहन करुन पालकमंत्री म्हणाले की, या क्षेत्रासाठी फॉरेस्ट गेस्ट अशी नवी संकल्पना राबविली जाणार आहे.  पालकमंत्री यांनी भांमडेळी, मोहुर्ली व आगरझरी येथील जिल्हा परिषद शाळेस भेट देवून ई-लर्निग वर्गाची पाहणी केली. यावेळी त्यांनी  विद्यार्थ्यांशी व शिक्षकांशी संवाद साधला.  उत्कृष्ट  व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सदैव तत्पर राहा असे ते म्हणाले.

बफर क्षेत्रात 79 गावापैकी जन-वन विकास योजनेच्या माध्यमातून 50 गांवाची निवड करण्यात आलेली आहे. सदर निवड केलेल्या गावापैकी 47 गावांतील शाळेमध्ये ई-लर्निगचा उपक्रम राबविण्यात येत आहे.  ई-लर्निंगचे संच गावातील शाळेमध्ये उपलब्ध झाल्याने शाळेतील शिक्षक व मुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.  ई-लर्निग व्यवस्थेमुळे मुलां-मुलींच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास तसेच ॲनिमेशन व क्विझमुळे मुलां-मुलींच्या बौध्दीक क्षमतेचा विकास होणार आहे व शिक्षणाची आवड निर्माण होवून शाळेतील पटसंख्या वाढण्यास मदत मिळेल.
ई-लर्निंगमुळे 47 शाळांमधील 6 हजार 647 विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळेल असे जे.पी.गरड यांनी प्रास्ताविकातून सांगितले. त्याचप्रमाणे या क्षेत्रातील नागरिकांना फिल्टर वाटर, घरगुती गॅस वाटप, नाला खोलीकरण, अगरबत्ती प्रकल्प, चरख्याव्दारे सुतकताई असे विविध उपक्रम राबविले जात असल्याचे जे.पी.गरड यांनी प्रास्ताविकात सांगितले.  यावेळी संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांचे सदस्य, गावकरी, शिक्षक व वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
              

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.