* प्रविण गोंगले / चंद्रपूर * /--

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील इरई जलाशयात वनविभागाच्या वतीने सुरु करण्यात आलेली बोटींग पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनेल असे प्रतिपादन पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
पालकमंत्री यांच्या हस्ते आज इरई जलाशय बोटींगचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकार, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक तथा मुख्य वनसंरक्षक जे.पी.गरड, उपसंचालक बफर झोन गजेंद्र नरवणे व उपसंचालक कोअर ए.एस.कळसकर यावेळी उपस्थित होते.
बोटींग पर्यटनामुळे बाजूबाजूच्या तीन गावातील लोकांना रोजगार प्राप्त होणार आहे. येणा-या पर्यटकांचे समाधान होईल तसेच त्यांना उत्तम सेवा मिळेल याची खबरदारी घेण्याचा सल्ला त्यांनी दिला. स्वत:चे काम असे समजून हे काम करा असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, येथे येणा-या पर्यटकांना हा बोटींगचा अनुभव आनंद देणारा ठरावा.
यावेळी पालकमंत्री यांनी स्वत: 300 रुपये भरुन बोटींगचे तिकीट खरेदी केले व बोटींगचा आनंद घेतला. निसर्गरम्य अशा जलाशयात बोटींग करणे आनंददायी आहे असे ते म्हणाले. हाच अनुभव सर्व पर्यटकांना देण्यासाठी सतत प्रयत्नशिल राहा असे ते म्हणाले.
<><> अगरबत्ती प्रकल्पास भेट <><>
वनविभागाच्या वतीने महिला सक्षमीकरण यासाठी सुरु करण्यात आलेल्या आगरझरी येथील अगरबत्ती प्रकल्पास पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली. या ठिकाणी काम करणा-या महिलांना पालकमंत्री यांच्या हस्ते मजूरीचे धनादेश वाटप करण्यात आले. तसेच फिल्टरचे वाटप करण्यात आले.
या अगरबत्ती प्रकल्पातील महिला मशिनव्दारे बांबूच्या काडीचा उपयोग करुन अगरबत्ती तयार करतात. दररोज प्रत्येक महिला साधारणता 12 ते 15 किलो अगरबत्ती निर्मिती करतात. सदर प्रकल्पामुळे दररोज 200 ते 250 किलो अगरबत्तीचे उत्पादन होते. एका महिण्याकाठी कमीत कमी 5 हजार रुपये मजूरी मिळते. या प्रकल्पातून आतापर्यंत झालेल्या उत्पादनातून 5 लाख 30 हजार एवढी रक्कम जमा झाली आहे. या प्रकल्पाचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले.
<><> चरखा प्रकल्प <><>
ताडोबा अंधारी व्याघ्र फॉऊडेशनच्या वतीने चालविण्यात येणा-या मोहुली येथील व्याघ्रबंध चरखा प्रकल्पास पालकमंत्री यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी स्वत: सूत कताई केली. या प्रकल्पात काम करणा-या महिलांशी त्यांनी संवाद साधला. येथे निर्माण होणा-या धाग्यास बाजार पेठ मिळत नसल्याचे निर्दशनास येताच धागा उद्योग व गारमेंट उद्योगाशी आपण स्वत: बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे ड्रेस डिझाईन करणा-या कंपन्यासोबत सुध्दा बोलणी केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.
------------------------ प्रविण गोंगले, चंद्रपूर

Post a Comment