सिंदेवाही / चंद्रपूर :---
विहीर बांधकामाचा धनादेश काढण्यासाठी एका शेतकर्याकडून २ हजार रुपयांची
मागणी करणार्या चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही पंचायत समितीचे संवर्ग
विकास अधिकारी श्री पुद्दटवार यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने
आज अटक केली. या कारवाईमुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या वातावरणात
एकच खळबळ उडाली आहे.
तक्रारकर्ते हे शेतकरी असून ते सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथील
रहिवासी आहेत. तक्रारकर्त्याला सन २00७-0८ मध्ये दीड एकर शेतजमीन वाटपात
मिळाली. तेव्हापासून ते त्या जमिनीवर वहीवाट करीत असून त्यांना शासनाकडून
विहीर मंजूर झाली. तक्रारकर्त्याने मजूर लावून आपल्या शेतात विहिरीचे
खोदकाम केले. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर विहीरीच्या बांधकामासाठीर शासनाकडून
२ लाख ५0 हजार रुपये मंजूर झाले. तक्रारकर्त्या शेतकर्याला पहिला हप्ता १
लाख १0 हजारांचा धनादेश पंचायत समितीकडून प्राप्त झाला. विहिरीच्या
उर्वरित रकमेसाठी त्या शेतकर्याने ११ एप्रिल २0१६ रोजी पंचायत समितीचे
संवर्ग विकास अधिकारी पुद्दटवार यांची भेट घेऊन धनादेशबाबत विचारणा केली
असता ८0 हजारांचा धनादेश निघाला आहे तो घेण्याकरिता तुम्हाला २ हजार रुपये
द्यावे लागतील, असे संवर्ग विकास अधिकारी म्हणाले. संवर्ग
विकासअधिकार्याला पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबतची तक्रार
चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे केली. या तक्रारीनुसार १२
एप्रिल रोजी पंचायत समिती सिंदेवाही येथे लाच रक्कमेबाबत पडताळणी केली असता
संवर्ग विकास अधिकारी पुद्दटवार यांनी तक्राकर्त्याकडून तडजोडीअंती १५00
रुपये रक्कमेची मागणी पंचासमक्ष करून लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली.
त्यावरून सापळा रचून आज २५ एप्रिल रोजी पंचायत समितीच्या कार्यालयात सापळा
रचला असता पुद्दटवार हे तक्रारकर्त्याकडून १५00 रुपये स्वीकारत असताना
'एसीबी'च्या पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय दराडे, पोलीस उपअधीक्षक श्री सुपारे यांच्या
मार्गदर्शनात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्री आचेवार,
श्री महेश मांढरे, श्री मनोज पिदूरकर, श्री संतोष येलपूलवार, श्री अजय
बागेसर, सुरेश वराडकर यांनी पार पाडली
Tuesday, April 26, 2016
सिंदेवाही पं.स. मधील 'बीडीओ' श्री पुद्दटवार 'एसीबी' च्या जाळय़ात
Posted by vidarbha on 7:48:00 AM in http://vidarbha24news.com/ | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment