अमरावती /---
कुर्हा ते भिवापूर मार्गावर असलेल्या धरणाच्या वळणरस्त्यावर भरधाव वेगाने
येणार्या दुचाकीने रस्त्याच्या कडेला असलेल्या उभ्या झाडाला जबर धडक
दिल्यामुळे या अपघातात दुचाकीस्वार असलेल्या दोन युवकांचा मृत्यू झाल्याची
घटना सोमवारी दुपारी घडली.
आर्वी येथील रहिवासी असलेले मृत सत्यम सुधीर पुरोहित, अमन रोजेश टावरी असे
युवकांचे नाव आहे. दोघेही यामाहा कंपनीचे दुचाकी वाहन क्रमांक MH २७ DJ
१0४२ ने भरधाव वेगाने येत असताना भिवापूरजवळ असलेल्या धरण वळण
रस्त्यावरच्या काठावरती असलेल्या झाडाला गाडी ठोकली. वाहनाचा वेग इतका
जास्त होता की, दुचाकी वाहनाचा चुरा झाला असून, अमन टावरीचा घटनास्थळावरच
मृत्यू झाला तर सत्यम पुरोहित याला जबर मार लागल्यामुळे स्थानिक कुर्हा
रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्याची प्राणजोत मालविली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, दुचाकीचा वेग प्रमाणपेक्षा जास्त
होता व सर्व वाहनांना ओव्हर टेक करण्याच्या नादात हा अपघात झाल्याचे
नागरिकांनी सांगितले. मृतांच्या कुटुंबियांनी केलेल्या विनंतीवरून दोन्ही
मृतांचे पोस्टमार्टम आर्वी येथे करण्यात आले.

Post a Comment