BREAKING NEWS

Tuesday, April 26, 2016

श्री भुजबळ यांचा सोशल मीडियात व्हायरल झालेला तो फोटो खरा -भुजबळ यांना डिस्चार्ज तुरूंगात रवानगी


वृत्तसंस्था/मुंबई - - महाराष्ट्र सदन घोटाळ्य़ातील आरोपी व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना सोमवारी सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्जनंतर पुन्हा त्यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली. महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी १४ मार्चला ११ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालय (ईडी)कडून भुजबळांना अटक करण्यात आली होती. १८ एप्रिलला छगन भुजबळ यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. भुजबळ यांना दातदुखी आणि छातीत दुखण्याचा त्रास होता. रुग्णालयात दाखल केले, तेव्हा त्यांचा रक्तदाब १८0-१२0 इतका होता. त्यामुळे तत्काळ त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले. सोमवारी सर्व प्रकारच्या तपासण्या झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. कडक पोलीस बंदोबस्तात त्यांची आर्थर रोड तुरुंगात रवानगी करण्यात आली. शनिवारी सोशल मीडियावर भुजबळांचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोतील भुजबळांचे बदललेले रूप पाहून अनेकांना त्यावर विश्‍वास बसत नव्हता. मात्र, रुग्णालयातून बाहेर आलेल्या भुजबळांचा नवा अवतार पाहून सोशल मीडियात व्हायरल झालेला तो फोटो खरा असल्यावर शिक्कामोर्तब झाले. कारण, भुजबळ थकलेले दिसत होते. त्यांची दाढी वाढली होती. दाढीचे सगळे केस पांढरे झालेले दिसत होते 
 
 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.