नाशिक /- - मंदिर प्रवेशाच्या सूत्रावरून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई
केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मागे राजकीय वलय
असून अप्रत्यक्षरित्या काँग्रेस पक्ष सक्रीय असल्याचा आरोप विश्व हिंदु
परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष एकनाथ शेटे यांनी केला आहे,
तसेच प्रत्येक वेळी हिंदु धर्मालाच लक्ष्य का केले जाते, असा प्रश्नही
त्यांनी उपस्थित केला. राज्यात सध्या मंदिर प्रवेशाच्या संदर्भात चालू
असलेल्या सूत्राच्या पार्श्वभूमीवर विहिंप आणि बजरंग दल यांनी
एकत्रितरित्या आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शेटे बोलत होते. या वेळी
विहिंपचे जिल्हामंत्री गणेश सपकाळ, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक श्री देविदास
वारूंगसे आदी उपस्थित होते.

Post a Comment