विशेष प्रतिनीधी- (शहेजाद खान)-

चांदूर रेल्वे /
जानेवारी महिण्यात केलेल्या पाच दिवसाचे बेमुद्दत आंदोलनात
जिल्हाधिकाNयांनी घरकुल घोटाळयाची चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाईचे
लेखी आश्वासन दिले होते.त्याची पुर्तता न केल्यामूळे सामाजिक कार्यकर्ता
गौतम जवंजाळ यांनी २५ एप्रिल पासून स्थानिक गांधी चौकातील नगरपालीका
विहीरीत टांगते आंदोलन सुरू केले आहे. प्रशासन घरकुल घोटाळ्यातील दोषींवर
फौजदारी कारवाई करीत नाही तो पर्यंत हे अनोखे आंदोलन सुरू राहणार असा ठाम
निर्धार श्री जवंजाळ यांनी व्यक्त केला.
चांदूर रेल्वे येथील न.प.घरकुल योजनेत आजी-माजी नगरसेवकांनी सत्तेचा
गैरवापर करीत एकापेक्षा जास्त घरकुल लाटले. न.प. कर्मचाNयांसह अनेकांनी
नियम धाब्यावर बसवुन दोन पेक्षा जास्त घरकुल घेतले. काहींनी तर घरकुल न
बांधता चक्क पैसा हजम केला. हा सर्व घोटाळा गौतम जवंजाळ यांनी पुराव्यानिशी
बाहेर काढला. मात्र निगरगट्ट प्रशासनाने दोषींवर कारवाई न करता उलट गौतम
जवंजाळ यांना त्रास दिला व दोषींना पाठीशी घातले. त्यामूळे घरकुल
घोटाळयातील दोषींवर फौजदारी कारवाई करा यासह अन्य मागण्यासाठी श्री. जवंजाळ
यांनी २४ जानेवारीला स्थानिक तहसील कार्यालयसमोर बे-मुद्दत आंदोलन छेडले
होते. निगरगट्ट प्रशासनाने त्याकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामूळे उग्र
झालेल्या चांदूर वासीयांनी २९ जानेवारीला १०० टक्के चांदूर रेल्वे बंद
आंदोलन केले. जनतेचा वाढता रोष बघता जिल्हाधिकाNयांनी १० दिवसात चौकशी करून
कारवाईचे करण्याचे लेखी आदेश दिले.त्यानंतर जवंजाळ यांनी आंदोलन मागे
घेतले. मात्र जिल्हाधिकाNयांनी दिलेले आश्वासन पाळले नाही. या प्रकरणाला
तब्बल ८५ दिवस लोटूनही कारवाई झाली नाही. शेवटी आंदोलनकर्ते गौतम जवंजाळ
यांनी विहीरीत लटको अनोखे आंदोलन सुरू केले.एका सच्च्या कार्यकर्ताच्या
आंदोलनाला शहरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून शेकडो त्यांच्या आंदोलनाला
भेटी देत आहे. मात्र कारवाईत १०० टक्के नापास झालेले प्रशासन अद्यापही
झोपेच्या सोंगेतून बाहेर आहे नाही हे विशेष.
** गौतम जवंजाळ यांच्या मागण्या **
पाच आजी व माजी नगरसेवक व कर्मचाNयांनी एकापेक्षा जास्त घरकुल लाटले.त्या
सर्व न.प. घरकुल घोटाळ्यातील दोषींवर फौजदारी कारवाई, न.प.कार्यालय समोरील
व्यापारी संकुलाच्या अनियमीत बांधकामावर कारवाई करणे. घरकुल योजनेतंर्गत
नागरी सुविधासाठी साडे कोटी रूपयाचे अनुदान आले. ते नागरिकांना नागरी
सुविधेसाठी वापरल्या गेले नाही. ते नागरी सुविधेसाठी खर्च करा, मिलिंद
नगरातील महिला प्रसाधनगृह दुरूस्त करून सुरू करा, एकात्मीक गृह निर्माण व
झोपडपट्टी सुधार संलग्न कार्यक्रम २००६-०७ मध्ये मंजुर झालेल्या घरकुल
लाभाथ्र्यांना त्वरीत थकित रक्कम द्या, म्हाडाचे ३९७ मंजुर घरकुलावर
शासनाने मंजुर केलेल्या ७५ हजार रूपयाचा वाढीव निधी किती लाभाथ्र्यांना
देण्यात आले यांची माहित आणि महालक्ष्मीनगर व मदारी वस्तीत तातडीच्या
पाणीपुरवठा योजनेत अपात्र वंâत्राटदारा कडून कामे करून घेण्यात आले. त्या
दोषींवर कडक कारवाई करा.


Post a Comment