चांदूर रेल्वे/ शहेजाद खान (Vidarbha Buero Chif) /--

कोडेश्वर येथील सम्राट अशोक बुध्द विहार ते कोडेश्वर रस्त्याचे भूमिपूजन आ.रवि राणा यांच्या हस्ते पार पडले.
कोडेश्वर चे रहिवाशी व चतुराजी बहुउद्येशीय संस्थेचे सचिव प्रा.भगवान इंगळे यांच्या परिश्रमातून कोंडेश्वर येथे सम्राट अशोक बुध्द विहार निर्माण करण्यात आले. परंतु तिकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यामूळे जनतेला त्रास होत होता. जनतेचा त्रास पाहता आ.राणा व आंबेडकरी जनता यांच्या प्रयत्नामूळे सा.बां.विभागाच्या जिल्हा वार्षीक योजनेतंर्गत ५ लाखाचा निधी मंजुर झाला. आ.रवि राणा यांनी भूमिपुजन व कुदळ मारून रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला. आ.राणा यांनी सम्राट अशोक बुध्द विहाराला भेट दिली. यावेळी प्रा.भगवान इंगळे व त्यांच्या सहचारीनी साधन इंगळे यांनी आ.रवि राणा यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार केला. या प्रसंगी प्रा.प्रविण राऊत, प्रमोद देशमुख, देवानंद पाटील, वहीदभाई (अलमारीवाले), रफिक भाई (संत्रेवाले), भुपेंद्र इंगळे, संजय वानखडे, देविदास मोरे, मनोज वानखडे, समीर सुर्यवंशी, सचिन देशमुख, मनोज थोरात, आशिष डोंगरे, लक्ष्मन सावे भुषन जयस्वाल, संजय गायकवाड, धर्मपाल वानखडे, वैâलाश नाईक, विलास गवई, रामटेकेसर, आदित्य गवई, अनिता गवई, बबिता इंगळे, गजल वहीदभाई आदींची उपस्थिती होती.
Post a Comment