चांदूर रेल्वे/ शहेजाद खान (Vidarbha Buero Chif) /--

केन्द्रीय माहिती तंत्रज्ञान व व्यवसाय प्रशिक्षण मंडळ यांच्या वतीने महाराष्ट्र, गोवा व गुजरात या तीन
राज्यांची संयुक्त राज्यस्तरिय कॉम्प्युटींग इंटेलिजन्स ऑलिम्पीयाड परीक्षा पुणे येथे घेण्यात आली. यामध्ये
आमला विश्वेश्वर येथील श्रीकृष्ण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी ऋतुजा अजय धाडवे
हिने तीन राज्यातून पाचवा क्रमांक पटकविला. तीच्या यशामूळे श्रीकृष्ण हायस्कूलचे नाव तीन राज्यात
पोहचले हे विशेष.
या परीक्षेत तीन राज्यातील १० उत्कृष्ट विद्याथ्र्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये चांदूर रेल्वे
तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथील श्रीकृष्णहायस्कूलच्या वर्ग ८ वीच्या ऋतुजा धाडवे हीने ६८ टक्के
गुण प्राप्त करून तीन राज्यातून पाचवा क्रमांक पटकविला. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व व्यवसाय प्रशिक्षण
मंडळांच्या वतीने कॉम्प्युटींग इंटेलिजन्स ऑलिम्पीयाड परीक्षा तीन स्तरावर घेण्यात आली.शालेय स्पर्धेत
वर्ग ५ ते १० चे ६० हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यानंतर विभागीय स्तरावर परीक्षा घेण्यात आली.
यामध्ये श्रीकृष्ण हायस्कूलचे वर्ग ५ ते १० चे पाच विद्याथ्र्यांची निवड झाली. अकोला, अमरावती व
औरंगबाद या तीन विभाग मिळून ही परीक्षा घेण्यात आली.त्यामध्ये वर्ग ८ वी मधून ऋतुजा धाडवे
हीने प्रथम क्रमांक पटकविला. तर वर्ग ५ वी मधून प्राजंली विजय नंदरधने हीने व्दितीय क्रमांक मिळविला.
या यशाबद्दल श्रीकृष्ण व्यायाम शाळेचे अध्यक्ष आनंदराव बकाले, उपाध्यक्ष दीपक खेरडे व प्राचार्य सुरेश
देवळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवुन ऋतुजा धाडवे व प्राजंली नंदरधने यांचा सत्कार केला. यावेळी
पर्यवेक्षिका भारती अवधुतकर उपस्थित होत्या. या स्पर्धेसाठी शाळेचे संगणक प्रशिक्षक जीवन भोंगाडे
यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल ऋतुजा धाडवे हिच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Post a Comment