पुणे /--- -

स्थानिक हडपसरमधील शिंदे वस्ती येथे राहणाऱ्या एका प्रेमी युगुलाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (शनिवार) पहाटे 3 वाजता घडली. शुभम चव्हाण (21) व अश्विनी गावडे (18) असे या प्रेमी युगुलाचे नाव आहे. दोघांचंही एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. पण मुलाचं लग्न 8 मे ला ठरलं होतं. म्हणून पळून जाऊन त्यांनी रेल्वेखाली आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.काल (शुक्रवार) रात्री 10.30 वाजता ते घरातून निघाले होते. मध्यरात्री 2 वाजता घरच्यांनी ते हरवल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती. पहाटे तीनच्या सुमारास त्यांचा मृतदेह सापडला.
दोघांची घरे 100 मीटर अंतरावर आहेत. मुलगी गेल्या वर्षी 12 वी उत्तीर्ण झाली. तर मुलगा वडिलांबरोबर वेल्डिंगची कामे करण्यासाठी जायचा. दोघांनी ससाणे रोड, रामनगर जवळील रेल्वे ट्रॅकवर पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मालवाहतूक रेल्वेखाली आपली जीवनयात्रा संपवली.हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत

Post a Comment