http://vidarbha24news.com/ShowNews.aspx?id=2506
/-अनिल चौधरी / पुणे --



/-अनिल चौधरी / पुणे --



सलाम पुणे या संस्थेच्या वतीने होणाऱ्या महाराष्ट्र दिन सोहळ्यात प्रदान
करण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा आज येथे सलाम पुणे चे अध्यक्ष शरद
लोणकर यांनी केली .दरवर्षीप्रमाणे यंदा हि सलाम पुणे च्या वतीने
'महाराष्ट्र दिन सोहळा साजरा होत आहे . यंदा हा सोहळा २ मे पद्मावती येथील
अण्णाभाऊसाठे सभागृह येथे सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे .
> कलर्स वाहिनी वरील 'गणपती बाप्पा मोरया 'या मालिकेला विशेष
मालिकेसाठीचा सलाम पुणे पुरस्कार तर सरस्वती या मालिकेला उत्कृष्ट मालिकेचा
पुरस्कार जाहीर झाला . छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी साठी देण्यात
येणारा 'सलाम पुणे पुरस्कार यावेळी 'अस सासर सुरेख बाई ' या मालिकेतील
अभिनेता संतोष जुवेकर आणि अभिनेत्री मृणाल दुसाणीस यांना तर सिनेमा विभागात
' पोस्टर गर्ल ' ला उत्कृष्ट सिनेमासाठी चा सलाम पुणे पुरस्कार जाहीर झाला
. आणि पोस्टर गर्ल तसेच पोलीस लाईन या सिनेमांच्या उत्कृष्ट
दिग्दर्शनाबद्दल दिग्दर्शक समीर पाटील आणि दिग्दर्शक राजू पार्सेकर यांना
सलाम पुणे पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे .आगामी विशेष आकर्षण म्हणून
कलर लाईन आर्ट्स निर्मित 'सरगम ' या मराठी चित्रपटाचा यावेळी गौरव होणार
आहे सामाजिक क्षेत्रातील एड.संभाजीराजे थोरवे आणि योगेश पिंगळे यांना
यावेळी पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे . या शिवाय ३००० भागांची
पूर्णता करणाऱ्या 'मेजवानी परिपूर्ण या रेसिपी शो ला हि यावेळी पुरस्काराने
सन्मानित करण्यात येणार आहे . अभिनयाची उत्तम कारकीर्द म्हणून सहायक
अभिनेता प्रशांत तपस्वी यांना तर संतोष कोल्हे दिग्दर्शित 'ढोलकीच्या
तालावर 'या शोला बेस्ट डान्स शो म्हणून तर उत्कृष्ट विनोदी शो म्हणून
'कॉमेडीची बुलेट ट्रेन या शोला देखील पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार
आहे . 'विठा' या नाटकाचा संगीतकार आणि रंगभूषाकार शंतनू घुले यास
'उत्कृष्ट पदार्पण ' बाबत पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे .गाणी
नृत्य संगीत आणि विनोदाची बहार अशा स्वरूपातील पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख
पाहुणे म्हणून प्राध्यापक फुलचंद चाटे यावेळी उपस्थित राहणार आहेत .
> ----------------------------------
> स्थानिक कार्यक्रम
> सलाम पुणे आयोजित महाराष्ट्र दिन सोहळा
> टीव्ही आणि मुव्ही अवार्ड -गाणी नृत्य संगीत आणि विनोदाची बहार
> दिनांक - २ मे २०१६ ; वेळ - सायंकाळी - 5/30 ते 9/30
> स्थळ - अण्णाभाऊ साठे सभागृह ,पद्मावती पुणे
Post a Comment