* अनिल चौधरी / कर्जत *
डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे अनेक उपक्रम राबविण्यात येते असल्यांने सध्या तालुक्याच्या ठिकाणी पाण्यांचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे.आज पिण्याच्या पाण्यासाठी महीला वर्गांना तारेवरची कसरत करावी लागत असल्यांने या समस्यांवर वर मात करण्यासाठी प्रतिष्ठान तर्फे विहीर स्वच्छता अभियान राबविण्यात येत असल्यांचे श्री.सद्स्यांनी बोलताना सांगितले.
उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्यांचे सावट निर्माण होत असते.गावातील विहीर तळ गाठत असतात,पाण्यांची पातळी वाढून पिण्याच्या पाण्यांची टंचाई दूर व्हावी या उद्दात हेतूने खालापूर तालुक्यातील आंबिवली,वारद,इसांबे ,नडोदे,सावरोली,चावणी,गारमाळ,नंदनपाडा,तसेच या परिसरातील आदिवासी वाड्यामध्ये १२ विहीरिंची स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी गावातील ग्रामस्थ तसेच श्री सद्स्य या विहीरींची स्वच्छता करण्यास मग्न झाले असल्याचे दिसून आले.विहिरी कोरड्या पडत असल्याने विहिरीच्या तळाशी गाळ हे मोठ्या प्रमाणात जमा झालेला असतो.पावसाला सुरु झाला कि विहिरी पावसाच्या पाण्याने पूर्ण भरल्या जातात आणि गाळ काढल्याने विहिरीतील पाणी दूषिद्ध होऊन जाते. या पाण्यापासून विविध आजार निर्माण होण्याचा धोका संभवत असतो. शिवाय या गाळा मुळे नैसर्गिक झरे बंद होत असतात.जून महिन्यात पावसाचे आगमन होत असल्यांने विहीर स्वच्छ करण्यास मिळत नाही.यामुळेच या विहारिंची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असल्याचे श्री. सदस्यानी सांगितले.
Post a Comment