अमरावती // -- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस हे दि.30 एप्रिल, 2016 रोजी म्हणजे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे मा.मुख्यमंत्री फडणवीस यांचे दि.30 एप्रिल, 2016 रोजी सकाळी 11-30 वाजता बेलोरा विमानतळ येथे आगमन होणार असून तदनंतर मोटारीने टेक्सटाईल पार्क, नांदगाव पेठ अमरावतीकडे प्रयाण करतील दुपारी 12 वाजता टेक्सटाईल पार्क, नांदगाव पेठ येथे आगमन व सियाराम सिल्क मिल लिमि.चे उद्घाटन हे त्यांचा शुभ हस्ते होणार आहे . त्यानंतर दुपारी 12-30 वाजता जे के इन्व्हेस्टर (बॉम्बे) लि. आणि रेमंड ग्रुप कंपनीचे भुमिपूजन समारंभास मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहतील. टेक्सटाईल पार्क येथून दुपारी 1-30 वाजता मोटारीने बेलोरा विमानतळाकडे प्रयाण करतील . दुपारी 2 वाजता बेलोरा विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबई कडे प्रस्थान करतील
Saturday, April 30, 2016
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती जिल्हा दौऱ्यावर.
Posted by vidarbha on 9:24:00 AM in http://vidarbha24news.com/ | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment