चंद्रपूर / प्रवीण गोंगले /----
1995 पासून
विसापूरची जनता आपल्या पाठीशी उभी राहली. म्हणून विसापुरचा विकास करणे माझे
कर्तव्य आहे. रस्तासाठी 20 लाख रुपये मंजूर केले. स्मशान भूमी रस्ताही
मंजूर केले. रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्यासाठी रेल्वे मंत्री ला विनंती करणार. निवेदनात नमूद केलेले सर्व विकास कामे पूर्ण
करण्याचा प्रयत्न करणार. वनस्पती उद्यानामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून विकासाचा आराखडा तयार करत आहोत.
येथील शेतक-यांच्या शेतात विहीर
खोदण्याची योजना राबविली जाईल. आरोग्य केंद्र या पेक्षाही उत्तम करणार व सर्व
साहित्य देणार असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.
प्राथमिक आरोग्य
केंद्र व प्राथमिक शाळेच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा विसापूर येथे पालकमंत्री
यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शिवाजी चौक विसापूर येथे जाहिर सभा घेण्यात
आली. जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे, सभापती देवराव भोंगळे, जिल्हा परिषद सदस्य टोंगे उपस्थित होते.
Post a Comment