चंद्रपूर / प्रवीण गोंगले /--
विसापूर येथे तयार
करण्यात येणारे बॉटनिकल गार्डन हे देशातील सर्वात उत्तम गार्डन होणार असून वनस्पती
शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यासाठी विसापूर गार्डन खुले विद्यापीठ असेल असे मत
पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. बल्लारपूर मार्गावर
असलेल्या विसापूर येथे बंगोलरच्या धर्तीवर निर्माण करण्यात येणा-या बॉटनिकल
गार्डनच्या संरक्षण भिंतीचे
पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले त्यावेळी ते
बोलत होते.
वनविकास
मंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल हे अध्यक्षस्थानी होते. मुख्य
वनसंरक्षक तथा उपमहासंचालक सामाजिक वनीकरण महीप गुप्ता, अधिक्षक अभियंता डी.के.बालपांडे, उपसंचालक सामाजिक वनीकरण डी.आर.काळे व
कार्यकारी अभियंता मनोज जयस्वाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
7 कोटी रुपये खर्च करून ही संरक्षण भिंत
बांधण्यात येत असून 250 हेक्टरवर बॉटनिकल गार्डन निर्माण करण्यात
येणार असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तमातील उत्तम गार्डन तयार करण्यात येणार असून
यामुळे विसापूर येथील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्त होणार आहे. बॉटनिकल
गार्डनला भेट देण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येतील असे ते म्हणाले. तीन वर्षात
उद्यान पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 250 कोटी रुपये
खर्च करून विसापूर जवळ सैनिकी शाळा उभारण्यात येणार असून सैनिकी शाळेमुळे
विसापुरची अर्थव्यवस्था बदलणार आहे. विसापुरला आपण विविध विकास कामे केली असून येथील चित्र बदलणार
असल्याचे ते म्हणाले.
Post a Comment