नैकेले /--
अचलपूर:- /--
संपूर्ण महाराष्ट्र पाण्याच्या दुष्काळाने त्रस्त असताना अचलपूर नगरपालीका
मात्र मस्त आहे
अचलपूर नगरपालीके तर्फे चालवील्या जाणा-या पाणीपूरवठयाची कथा काही
निराळीच आहे संपूर्ण राज्य उन्हाने पोळून निघाले मराठवाडयासह राज्यात
पाण्याचा दुष्काळ पडलेला आहे लातूरला तर रेल्वेने पाणी पूरवावे लागले तरीही
नगरपालीका अचलपूरचे डोळे ऊघडलेले नाही पाण्याचे नियोजन तसेही या
नगरपालीकेला केंव्हाच जमले नाही.मात्र कमीत कमी सगळीकडे हाहाकार सुरू
असतांना तरी पाण्याचे नियोजन ही मानवतेची बाब आहे मात्र या नगरपालीकेला
कुणाचीच काही पर्वा नाही या शहरात आजही रस्त्यावर,नालीमधुन पीण्याचे पाणी
वाहत आहे आजही जागोजागी लीकेजेस आहेत सार्वजनीक नळांना तोटया नाही व पाणी
विनाकारण वाहत असते अमरावती जिल्ह्याअंतर्गत येणा-या या अ वर्ग नगरपालीके
कडे जिल्हाधिकारी महोदयांचे सुध्दा लक्ष नाही निवेदन देवूनही जिल्हाधिकारी
कार्यालयाने दखल घेतलेली दिसत नाही एकीकडे पाण्याच्या विषयी एवढे जागृत
जिल्हाधिकारीसाहेब जलयुक्त शिवाराचे मोठया प्रमाणावर प्रकल्प राबवून व
वाॅटर कप सारखा उपक्रम हातात घेवून पाण्याचे प्रश्नावर जागृत असलेल्या
अमरावती जिल्हाधिकारी अचलपूर नगरपालीकेकडे डोळेझाक का करीत आहेत असा प्रश्न
जनता विचारत आहे व यावर त्वरीत कार्यवाही व्हावी अशी मागणी केली आहे.
Post a Comment