सुरज देवहाते / अमरावती /---
दोन दिवसांमध्ये अमरावती करांनी प्रचंड एकीचे दर्शन घडवले. सरकारी खात्याला शोभणार नाही असा निर्भीडपणा, प्रत्येक कामात पारदर्शीपणा आणि त्वरित निर्णय घेण्याची क्षमता यामुळे गुडेवार अमरावतीकरांच्या गळ्यातले ताईत झाले.
श्री चंद्रकांत गुडेवार यांची बदली रद्द करण्यासाठी सर्व अमरावती कर जनता सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना सर्व स्थानिक स्वीकृत नगरसेवक अपंग बांधव बुजुर्ग महिला मागील दोन दिवसांपासून रस्त्यावर आल्या आहे आज अमरावती मध्ये असलेला अमरावती बंद सुधा उत्स्फूर्त प्रतिसादाने संपन्न झाला शहरातील सर्वच मुख्य प्रतीष्टाने आज बंद होती
श्री गुडेवारांसारख्या अधिकाऱ्याची अशा प्रकारे एकाकी बदली ही तमाम अमरावती कर जनतेची मानहानी आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांनी काळ पासून एकजूट दाखवली आहे कधी न्हावे ते सर्वपक्षीय नगरसेवक संघटना एकत्र आल्या आहेत . त्यात आजचा उत्स्फूर्तपणे झालेला "बंद‘, स्वाक्षरी मोहिमेपासून मोर्चांपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने नागरिकांनी गुडेवारांवरील प्रेम दाखवले. अमरावती चा विकास होईल आणि महानगरपालिकेतील उर्मट, उद्धट आणि खा खा सुटलेले काही जणांना व त्यांच्या चेल्यांना गुडेवार पळताभुई थोडी करतील, अशी अमरावती कर नागरिकांची अपेक्षा आहे. त्यामुळे मध्येच "मी नाही जा‘ असं म्हणून अर्ध्यावर डाव सोडून जाणाऱ्या आयुक्तांचीबदली शाश्नाने रद्द करावी हीच मागणी अमरावतीचा सर्वसामान्य जनतेची आहे.
अमरावती मनपातील काही कर्तव्यनिष्ठ नगरसेवक ज्यात प्रामुख्याने श्री राजू भाऊ मानकर , श्री दिनेश भाऊ बूब , श्री प्रदीप बाजड , श्री धीरज हिवसे अशे अजूनही बरेचसे नगर सेवक आयुक्तांचा बदलीचा विरोधात आहे ज्यात त्यांचा कुठलाही वयक्तिक स्वार्थ नाही पण अमरावतीचा विकास हाच माणूस किवा अधिकारी करू शकतो याच भावनेने आम्ही या बदलीचा विरोध करीतआहोत असेही काही नगरसेवकांचे मत आहे
मनपा आयुक्त श्री चंद्रकांत गुडेवार यांची एका वर्षातील कारकीर्द अतिशय चांगली गाजली. समाजातील प्रत्येक नागरिक त्यांच्याकडे एक प्रामाणिक अधिकारी म्हणून काम घेऊन येतो आणि ते काम झाल्याशिवाय राहत नाही. त्यांनी शहरात धडाडीचे कार्य केले असून मनपाच्या कर्मचार्यांना शिस्त लावली. या आधी हि स्वीकृत नगरसेवकांनी आपल्या स्वाक्षरी चे निवेदन महापौर यांना दिले होते ,स्थानिक आम आदमी पक्षाचा कार्यकर्त्यांनी सुधा जिल्हाधिकारी यांना बदली रद्द व्हावी या साठी सह्यांचे निवेदन दिले होते काल सुधा शिवसेना युवा सेना तर्फे निषेध नोद्वाण्यात आला होता. आम आदमी पक्षाचा प्रत्येक दिल्या जाणार्या निवेदनावर श्री चंद्रकांत गुडेवार तत्काळ कार्यवाही करायचे असे मत आम आदमी पक्षातील काही पदाधिकार्यांनी व्यक्त केले आहे
पोलिसांनी राजकमल चौकात आंदोलन करत्याना पेंडाल खाली करायला लावला परंतु यावेळी उपस्थित
श्री दिनेश बूब , श्री प्रदीप बाजाड यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले कि आम्ही परमिशन काढून शांतपूर्ण मार्गाने इथे बसलो आहोत
तोडफोड करण्या संदर्भात प्रदीप बाजड , श्री दिनेश भाऊ बूब व उपस्थित सर्वच नगरसेवकांनी जाहीर माफी मागितली आहे.
** श्री दिनेश बूब **
तोडफोड करण्या संदर्भात आम्ही
व आमचा कुठल्याही कार्यकर्त्यांनी असले कृत्य केले नाही असे ते म्हणालेआमचा आंदोलनाचा वेगळ्या मार्गाने वळवण्याचा प्रयत्न केला जातोय , ते पुढे म्हणाले कि चुकीचे लोक आपल्या मध्ये घुसवण्यात आले आहेत ,जे दुकाने बंद करीत नाही ते व्यापारी शासनचचा बाजूने असतील त्यांना आग्रह करू नका असेही ते म्हणाले हात जोडून विनंती करून दुकाने बंद करायला लावा
..............................................................................................................................................................
( संपादकीय )
अन्याय,
अत्याचार, पीडित, व्यथित, वंचितांची बाजू घेऊन लढणाऱ्या श्री गुडेवारांना
राजकीय नेते किंवा प्रशासकीय व्यवस्थेने झुगारायचे ठरवले तरी जनता
त्यांच्या पाठीशी आहे. हा विश्वास, हे प्रेम, ही आत्मीयता गुडेवारांनी
ध्यानात घ्यायला हवी.
येणारा काळ आणखी अवघड आहे.
कसोटीचे क्षण अधिक तीव्र
होतील.अमरावती करांचे प्रेम, आकांक्षा पाठीवरून वाहून नेताना त्याचा सूळ
व्हावा, अशी धडपड करणारे राजकारणी असतीलही; पण त्यावर मात करण्याचं बळ
इथल्या जनतेनेच गुडेवारांना दिले आहे. तेव्हा लढाई चालू ठेवा,
अवघे अमरावती कर
तुमच्या पाठीशी आहे, असाच संदेश इथला सर्वसामान्य माणूस देतो आहे
आज खूप आनंद वाटला सर्व अमरावती कर राजकारण सोडून गुडेवार साहेबा साठी एकत्र आलेत आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत साहेब
ReplyDeleteआज खूप आनंद वाटला सर्व अमरावती कर राजकारण सोडून गुडेवार साहेबा साठी एकत्र आलेत आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत साहेब
ReplyDelete