प्रवीण गोंगले / चंद्रपूर /---

चंद्रपूर आणी परिसरात उष्णतेची लाट कायम आहे. चंद्रपूरचे तापमान सातत्याने ४६ अंशापर्यंत उसळी मारत असल्याने नागरिक हैराण आहेत. गेले २ दिवस तर चंद्रपूर देशातील सर्वाधिक तापमानाच्या शहरांपैकी एक ठरले आहे. आधीच पाणीटंचाई व त्यात तापमानाचा तडाखा यामुळे नागरिक धास्तावले आहेत.
गेले साधारण ८ दिवस वादळी आणि कमी तापमानाचे दिवस अनुभवल्यानंतर चंद्रपूरात सुर्यनारायण जणू आग ओकू लागला आहे. देशात राजस्थानात नोंदले जाणारे तापमान सातत्याने चंद्रपुरात नोंदले जाऊ लागले आहे. चंद्रपुरात असलेल्या कोळसा खाणी आणि वातावरणातील प्रदूषण यामुळे तापमान उच्चांकी आहे. चंद्रपूरचे तापमान सर्वाधिक प्रदूषित शहर चंद्रपूर आता सर्वाधिक उष्ण शहर असा बदलौकिक प्राप्त करण्याच्या मार्गावर आहे. पर्यावरणीय बदलांमुळे तापमान वाढ उच्चांक गाठत असतांना हे रोखण्यासाठी मात्र ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत. याचा थेट परिणाम चंद्रपूरचा अधिक कडक होण्यात झाला आहे. शहरातील रस्ते दुपारी निर्मनुष्य झालेले बघायला मिळत आहेत. आवश्यक कामांसाठीच नागरिक घराबाहेर पडत असून बाहेर पडतानाही कान-चेहरा रुमालाने झाकण्याची काळजी घेत आहेत. या उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिकांची दैनंदिनीच बदलून गेली आहे. उन्ह तापायच्या आत आवश्यक ती कामे करून घर गाठत कुलर -एसी मध्ये दाह कमी करणे हा दिलासा शोधला जातोय.
पर्यावरणाला बाधा पोचविणा-या व ऋतूचक्रात अडसर आणणा-या प्रत्येक गोष्टी या जिल्ह्यात बिनदिक्कतपणे केल्या जात आहेत. त्याचाच परिणाम म्हणजे अगदी देशातील सर्वाधिक तापमानाच्या शहरांच्या तुलनेत चंद्रपूर दुर्दैवाने आता आघाडीवर पोचले आहे.

Post a Comment