प्रविण गोंगले / चंद्रपूर / -

चंद्रपूर जिल्ह्यातील सोमनाथ येथे आज पासून ७ दिवसांचे श्रमसंस्कार शिबीर आयोजित करण्यात आले आहे. कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी बाबा आमटे यांनी मूल तालुक्यात सोमनाथ प्रकल्पाची सुरवात केली होती आणि पुढे याच सोमनाथ ला १९६७ पासून बाबा आमटे यांनी तरुणांना श्रमाच्या माध्यमातून समाजसेवेचे धडे देण्यासाठी या श्रमसंस्कार शिबिराची सुरुवात केली. या शिबिरात ग्रामीण अर्थव्यवस्था, शेती आणि जलसंधारणाच्या सारख्या विषयांवर विशेष भर दिला जातो. प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्यासोबतच शिबिरात अनेक सामाजिक विषयांवर चर्चा, तज्ञानची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहे. आज सकाळी डॉ.विकास आमटे यांच्या हस्ते शिबिराचं उदघाटन करण्यात आलं. १५ मे ते २२ मे पर्यंत हे शिबीर आयोजित करण्यात आलं असून यात जवळपास ६०० लोकांनी सहभाग नोंदविला आहे.

Post a Comment