Devari News /-- -

देवरी-आमगाव मार्गावरील देवरी पोलीस स्टेशन अंतर्गत येर्णा लोहारा येथे प्रवासी निवार्यात दबून १६ वर्षीय मुलगी जागीच ठार झाल्याची घटना आज सोमवारला सायकांळी ६ वाजता दरम्यान घडली.सविस्तर असे की,लोहारा येथील चौकात असलेल्या प्रवासी निवार्यात आपल्या वडीलांची वाट बघत मनिषा देवाजी भोयर ही मुलगी बसली होती.त्याचवेळी त्याचौकात असलेल्या एका टॅकचालकाने टड्ढक(सीजी ०४,जेडी ७९२९) रिव्हर्स घेतांना प्रवासी निवार्याला धडक दिली या धडकेत प्रवासी निवाराच पुर्णत कोलमडला त्यामध्ये मनिषा दाबली गेली आणि तिचा घटनास्थळीच मृत्यु झाला.मनिषाचे वडील देवाजी भोयर हे मुलीला लोहारा बसस्थानकात सोडून आपल्या भावाला हरदोली येथे सोडायला गेले होते,ते परत येईपर्यंत या अपघातात तिचा मृत्यु झालेला होता.टड्ढकचालकाचे नाव विनोद मोहन लटये असून देवरी पोलीसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.

Post a Comment