अहेरी / रंगया रेपाकवार /--

मागील तीस वर्षात गडचिरोली जिल्ह्यात शोषित आणि पिडीत जनतेच्या नावाने घुसलेले नक्षलवादी त्याच शोषित आणि पिडीत जनतेच्या भरोश्यावर शक्तिशाली झाले आणि आज अशी परिस्थिती आली आहे की हेच नक्षलवादी स्वतःच्या स्वार्थासाठी या शोषित, पिडीत आणि दलित जनतेला पुढे जाऊ देत नाहीत.
गडचिरोली जिल्हा म्हटले की नक्षलवाद्यानी केलेल्या आदिवासींच्या हत्या डोळ्यासमोर येतात. पण आदिवासी क्षेत्रात दलित समाजाचे अस्तित्व असतेच. पण दलित समाज सुद्धा नक्षलवाद्यांच्या तावडीत सापडलेला असूनही त्याचा उल्लेख कधीही होताना दिसत नाही. गडचिरोलीचा विचार केला तर खरेतर आजपर्यंत नक्षलवाद्यांनी वीस पेक्षा जास्त दलितांच्या हत्या केल्या आहेत. खास करून अहेरी आणि सिरोंचा तालुक्यातील बऱ्याच दुर्गम गावात दलित लोकसंख्या आदिवासींच्या लोकसंख्येपेक्षा जास्त किंवा त्यांच्या जवळपास दिसून येते. शिकलेला, संघटीत आणि शहरी भागाशी जुळलेला हा समाज आज पुढे जाण्यासाठी तळमळतो आहे. पण नक्षलवाद्यांच्या दडपशाहीमुळे तो पुढे जाऊ शकत नाही. या भागातील रस्ते, पूल, वीज शाळा, अशी विकासाची कामे होऊ शकली नाही. याविरुद्ध वेळोवळी सुशिक्षित आणि संघटीत दलित समाजाने आवाज उठवला. पण हा आवाज उठवणाऱ्या माणसाला शांत करण्यात आले.
मात्र पत्रू दुर्गे प्रकरणापासून नक्षलवादी द्वारे होणाऱ्या दलित हत्येविरुद्ध आवाज उठवण्यात आला. पत्रू दुर्गे प्रकरण थेट S.C./S.T आयोगापर्यंत गेले. एवढे होऊनही छल्लेवाडा गावात बाबासाहेबांच्या जयंती कार्यक्रमात त्यांनी गोळीबार केला. इतकी संवेदनहीनता नक्षलवाद्यांनी दाखवूनही कोणी काही बोलले नाही. खरेतर ही राष्ट्रीय स्तरावरील बातमी होती, पण जिल्हास्तरावर दबून गेली कारण केवळ एकच - दहशत. मात्र या भागातील आंबेडकरी समाज धुमसत राहिला.
पण कितीही मोठे आव्हान हा आंबेडकरी समाज पेलू शकतो कारण हा समाज परिवर्तनाचा पाईक आहे हे दाखवण्यासाठी दि. २ जून १०१६ ला “दलित हत्याकांड करनेवाले नक्षलवादीके खिलाफ धिक्कार सभा”
हा कार्यक्रम भूमकाल संघटनच्या पुढाकाराने दामरंचाया अहेरी तालुक्यातील गावात आयोजित केला आहे. नक्षलवाद्यांचा “लाल सलाम” उघडपणे नाकारून बाबासाहेबांच्या सनदशीर आणि शांतीच्या मार्गाने जाण्याचा निर्धार या कार्यक्रमात दलित-आदिवासी बांधव करणार आहेत.
Post a Comment