हिंसाचाराचा संकटात पत्रकारिता - ✍पत्रकाराला जीवे मरण्याची धमकी✍
Posted by
vidarbha
on
9:59:00 AM
in
http://vidarbha24news.com/
|
अमरावती /---
|
ज्यांना धमकी देण्यात आली ते पत्रकार श्री बादल डकरे |
पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्थंभ आहे. समाज बदलाचे ते एक महत्वाचं साधन मानल्या जाते . याचा योग्य तो वापर करून समाजात एकोपा कसा वाढेल याकडे लक्ष नेहमीच दिले जाते परंतु समाजातील काही विघातक शक्ती पत्रकारांना सुद्धा बातम्या प्रसिद्ध केल्या म्हणून धमक्या देत आहेत असाच एक प्रकार अमरावती जिल्यातील चांदुर बाजार तालुक्यातील काजली या गावात घडला आहे.
|
स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्या |
|
स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्या |
|
स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्या |
|
स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्या |
|
स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्या |
|
स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्या |
सविस्तर वृत्त असे कि गावातील सरकारी स्वस्त धान्य दुकानदार श्री नागोराव बाबाराव वानखड़े यांनी मार्च महिन्याचे राशन परस्पर विकले त्या सबंधी तक्रार आल्यानतर vidarbha24news या ऑनलाईन वृत्त संकेत स्थळाचे व काही वृत्तपत्राचे स्थानिक प्रतिनिधी व पत्रकार श्री बादल डकरे यांनी नागोराव बाबाराव वानखड़े यांचा स्वस्त धान्य दुकानमधील झालेल्या गैरव्यवहारबाबत तशी बातमी प्रकशित केलि.बातमी प्रकशित केलि म्हणून याचा मुलगा प्रफ्फुल नागोराव वानखड़े याने तुला मी पाहून घेईल- तुला जीवनात सोडणार नाही.अश्या प्रकरचि धमकी पत्रकार श्री बादल डकरे यांना देण्यात आली त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये पत्रकार संरक्षण कायदा कधी संमत होणार अशी चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे अगदी कमी वयात पत्रकार श्री बादल डकरे यांनी सत्याच्या बाजूला उभे राहून समाजातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि ते शक्य तितक्या प्रमाणात समाजातील सर्वच स्थरातील लोकांना मदत करीत आहेत मात्र अश्या खऱ्या आणि निष्ठवांन पत्रकाराला जर धमकी किंवा शिविगाळ् होत असेल तर लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ म्हणून ओळख असलेला पत्रकारिता आता संपन्याच्या मार्गावर आहे.तरी शासनाला केव्हा जाग येणार हा प्रश्न गंभीर आहे.आता तरी सरकार ने पत्रकार संरक्षण क़ायदा पारित करावा अशी मागणी चांदूर बाजार तालुक्यातील पत्रकार करीत आहे. आलेली धमकी ही अत्यंत गंभीर बाब असून सरकारने या गोष्टीकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे या संबधीची तक्रार बादल डकरे यांनी चांदुर बाजार पोलिस स्टेशन मध्ये नोदविली आहे.पोलिस प्रशासन या सबधी कोणती कार्यवाही करेल याकडे सर्वाचे लक्ष्य आहे.
Post a Comment