काँग्रेस आघाडी शासित राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !
केरळमध्ये दलित विद्यार्थिनींवर होत असलेल्या
बलात्काराच्या घटनांच्या संदर्भात दलितांचा कैवार घेणारे कुठे आहेत ?
तथाकथित दलित विद्यार्थी रोहित वेमुला याने आत्महत्याकेल्यावर ते प्रकरण
संसदेत जाते, मग या विद्यार्थिनींच्या बाबतीत साम्यवादी आणि निधर्मी गप्प का ?

साभार / सनातन प्रभात
थिरुवनंतपूरम् (केरळ) - एर्नाकुलम् येथील विधी महाविद्यालयाच्या ३० वर्षीय विद्यार्थिनीवरील बलात्कार आणि तिची हत्या या घटनेवरून राज्यातील जनतेत संताप आहे. ही घटना ताजी असतांनाच वडकरा जिल्ह्यात १९ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. वडकरा येथील अयांथी येथील बीएस्सी नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर रिक्षा चालकाने रिक्शामध्येच बलात्कार केला. रिक्शाचालक पीडित मुलीच्या ओळखीचा होता. एका निर्जन ठिकाणी नेऊन चालक आणि त्याच्या दोन मित्रांनी मिळून मुलीवर बलात्कार केला.
या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. या दोन्ही घटनेतील विद्यार्थिनी दलित आहेत.
या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. या दोन्ही घटनेतील विद्यार्थिनी दलित आहेत.
१. एर्नाकुलम येथे
३० वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्या प्रकरणी पोलिसांनी एका
संशयिताचे रेखाचित्र प्रसिद्ध केले आहे. मात्र याप्रकरणी अद्याप कोणालाही
अटक झालेली नाही.
२. या प्रकरणी नवी माहिती समोर आली असून हत्या करण्यात आलेल्या मुलीने एका
वर्षापूर्वी मुलांकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार केली होती. मात्र
त्याकडे दुर्लक्ष केल्याचे तिच्या आईने पोलिसांना सांगितले.
३. हत्या झालेल्या मुलीवर आरोपीने ३० वेळा वार केल्याचे वैद्यकीय
अधिकार्यांनी सांगितले. शवविच्छेदन अहवालानंतर या संदर्भात अधिक पुरावे
समोर येऊ शकतील, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
४. या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप होत आहे. या
घटनेचा तपशील लपवण्यात येत असल्याचे तसेच बलात्काराच्या संदर्भातील माहिती
उघड केली जात नसल्याचे दिसून येत आहे.
Post a Comment