चंद्रपूर / प्रवीण गोंगले /---
वैद्यकिय पुर्व प्रवेशासाठी सर्वोच्च न्यायालयानं निट परिक्षेची सक्ती लादली आहे. यामुळं वर्षभरापासुन एम एस सि ई टी ची तयारी करणा-या पालक मानसिक तणावात आले आहे. त्यामुळं या निर्णयाच्या विरोधात व या निर्णयाच्या स्थगीतीसाठी सरकारनं वटहुकूम काढावा, या मागणीसाठी 14 मे रोजी मुक मोर्चा काढण्यात आला. गांधी चौक ते जटपुरा गेट पर्यंत काढण्यात आलेल्या मोर्च्यात विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.
यापुर्वी वैद्यकिय पुर्व प्रवेशासाठी सि ई टी परिक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य होतं. महाराष्ट्र शासनानं देखील याच परिक्षेचं आश्वासन दिल्यानं लाखो विद्यार्थ्यांनी तशी तयारी सुरु केली होती. यासाठी विद्यार्थ्यांनी जिव तोडुन अभ्यास केला. पालकांनी देखील आपापल्या पाल्यांकडुन तसा अभ्यास करवून घेतला. दरम्यान, वैद्यकिय पुर्व परिक्षेच्या ऐन तोंडावर सर्वोच्च न्यायालयानं वैद्यकिय पुर्व प्रवेशासाठी निट परिक्षेची सक्ती लादली.
गैरप्रकार टाळण्यासाठी हा निर्णय जरी लादला गेला असला तरी, यामुळं वर्षभरापासुन सि ई टी चा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांसह पालक मानसिक तणावात आले आहेत. विशेषतः या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम ग्रामीण भागातल्या गोरगरिब विद्यार्थ्यांवर झाला आहे. निट परिक्षेसाठी 2 वर्षाचा अभ्यासक्रम आणि 160 धडे आहेत.
परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 2 महिण्यात 160 धड्यांचा अभ्यास पुर्ण करुन निटची परिक्षा द्यावयाची आहे. 2 महिण्यात इतका अभ्यास करणं अशक्य असुन असा निर्णय देणा-यानी अशीच सक्ती आपल्या पाल्यांवर लादावी, असं खुलं आवाहन 13 मे रोजीच्या पत्रपरिषदेत संतप्त पालकांनी केलं होतं. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय योग्य व स्वागतार्ह आहे आणि त्याचं समर्थन देखील आहे.
पण, सक्ती लादण्याची ही वेळ योग्य नाही, आजवर जिव तोडुन वाचलेलं बाजुला ठेवा आणि नव्यानं अभ्यास करा, असं म्हणणं अन्यायकारक आहे, त्यामुळं या निर्णयाच्या निषेधार्थ तसंच सरकारनं विद्यार्थ्यांना या समस्येतुन सोडविण्यासाठी वटहुकूम काढुन निट रद्द करावी, यावर्षी राज्यानं घेतलेली एम एस सि ई टी ची परिक्षा मान्य करावी, या मागणीला घेउन मुक मोर्चा काढण्यात आला. यावेळी संतप्त पालकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सक्तीच्या निर्णयामुळं सर्वत्र नैराश्य पसरली असून या नैराशेत जर अनुचीत घटना घडल्यास तर याला जबाबदार कोण, असा सवाल केला आहे.
Post a Comment