प्रवीण गोंगले / चंद्रपूर /---
जिल्ह्यातील भिसी येथील गौरव उमेश मुंगले वय १३ हा आपल्या मित्रांसोबत स्थानिक आदर्श जनता विद्द्यालयाच्या पटांगनात क्रिकेट खेळत होता. खेळता खेळता चेंडू पटांगनालगतच्या वसीम बेग यांच्या आवारात पडला. बेग हे बाहेरगावी राहात असल्यामुळे त्यांचे घर मागील अनेक वर्षांपासुन बंद आहे. त्यामुळे गौरव हा चेंडू शोधन्यासाठी बेग यांच्या सुरक्षा भिंती वरून आवारात उडी घेतला. पण त्याने जिथे उडी घेतली त्या भितीच्या पलीकडील ठिकाणी लाकडी पाट्यानी झाकलेली विहीर होती. त्यामुळे भिंतीवरून उडी मारून तो सरळ विहीरीमध्येच पडला. ही बाब त्याच्या मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. त्यानुसार काही नागरीकांनी त्याला विहीरीबाहेर काढले व लगेच प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले, पण तिथे वैद्द्यकीय अधीकारी डॉ. सिध्दार्थ गेडाम यांनी त्याला मृत घोषीत केले. याघटनेमुळे कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असुन गावात शोककळा पसरली आहे...
Post a Comment