अमरावती / सूरज देवहाते /--
विदर्भ राज्य आंदोलन समिती व युवा आघाडी पश्चिम विदर्भ च्या वतीने १२ जून रविवार रोजी सकाळी ११ ते ५ य वेळेत अमरावती येथे विदर्भवादी युवकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ताजने मेमोरियल हॉल, झेन ईंग्लिश स्कुल,संघमित्रा होस्टेल जवल, लघुवेतन कॉलोनी, कॉंग्रेस नगर रोड, अमरावती येथे हि कार्यशाळा होणार आहे सदर कार्यशाळा हि विदर्भ राज्य आंदोलन समिती, युवा आघाडी, अमरावती जिल्हायांचा वतीने घेण्यात येणारआहे. दिवसभराची कार्यशाळा असल्यामुळे चहा व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
सदर कार्यशाळेत विदर्भ राज्य का..?, विदर्भ राज्याचे फायदे, विदर्भाचे अर्थशास्त्र व स्पर्धा परीक्षा इ. विषयावर युवकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी समितीचे ज्येष्ठ नेते एड. श्री वामनराव चटप, मुख्य निमंत्रक श्री. राम नेवले, प्रख्यात अर्थतज्ञ डॉ. श्री श्रीनिवास खांदेवाले, माजी पोलिस महासंचालक श्री. प्रबीरकुमार चक्रवर्ती तसेच युवा आघाडीचे पश्चिम विदर्भ प्रमुख प्रदीप धामणकर, डॉ. दीपक मुंढे, निखिल गवळी, डॉ. अभिजित पवार, पवन राउत ई. मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यशाळेत उपस्थित राहण्या साठी काही अडचणी असल्यास, किवा इतर कुठलीही माहिती घ्यायची असल्यास खालील नंबर वर संपर्क करावा.
डॉ.श्री महेश बलान्से (जिल्हा अध्यक्ष)
9545461532
श्री अमोल भिसेकर (जिल्हा उपाध्यक्ष)
9699722211
श्री अभिजित इंगळे (जिल्हा सचिव)
8421958279
श्री अर्जुन पडोळे (जिल्हा सरचिटणीस)
8856055508
9545461532
श्री अमोल भिसेकर (जिल्हा उपाध्यक्ष)
9699722211
श्री अभिजित इंगळे (जिल्हा सचिव)
8421958279
श्री अर्जुन पडोळे (जिल्हा सरचिटणीस)
8856055508
Post a Comment