अमरावती / सुरज देवहाते /--

आज सायंकाळ चा सुमारास अमरावती शहरात जोरदार वादळी वाऱ्याने हजेरी लावली ,ठिकठिकाणी झाडे पडली. 20 मिनिटांपर्यंत पावसाने झोडपून काढले वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. वाऱ्याला प्रंचड वेग होता. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट झाला. काही ठिकाणी झाडे पडली. पत्रे उडून गेले. सखल भागात पाणी साचले.. शहरात काही विजेच्या तारांवर झाडे पडली त्यामुळे लाईन पुरवठा खंडित झाला , पंचवटी गाडगे नगर येथी रस्त्यावर असणाऱ्या दुकानदारांचे खूप नुकसान झाले कारण वाढली वर हा अचानक आल्याने त्यांना त्याचं सामान सुरक्षित जागी न्यायला जमले नाही , स्थानी जिल्हाधिकारी कार्यालयात सुधा एक झाड वादळामुळे पडले , दयासागर चौकात असलेल्या गर्ल्स हायस्कूल परिसरात प्रचंड मोठ वडाच झाळ मुळासकट पडले , पंचवटी ते आरटी ओ मार्गावर सुधा काही झाडे रस्त्याचा बाजूला पडली ज्यात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी तिथे लागणाऱ्या मटनाचा दुकानदारांना याचा फटका बसला आहे. राधा नगर चा पहिल्या गल्लीत मध्ये हि रस्त्यावर झाड पडल्याने . काही वेळ वाहनधारकांना कसरत करावी लागली , शहरात ठिकठिकाणी लागलेले जाहिरातींची फलके सुधा अक्षरशः कोलमडून पडल्या , शिवाजी नगर मधील बाबा हॉटेल्स चा बाजूला असलेले मोठे फलक जमीनदोस्त झाले
Post a Comment