अभ्यासू व्यक्तिमत्व व कृषी खात्याशी तज्ञ असलेले अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. अनिल बोन्डे यांच्या नावाची महसूल मंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे आमदार डॉ. बोन्डे यांनी आपल्या मतदार संघात नालाखोली करून संपुर्ण महाराष्ट्रात नावलौकिक केले आहे. मोर्शी - वरुड तालुक्यातील नाला खोलीकरणाचा यशस्वी प्रयोग लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने त्याची दखल घेऊन संपूर्ण राज्यात जलयुक्त शिवाराची योजना अंमलात आणली आहे, त्याच बरोबर पांदन रस्त्याला सुद्धा त्यांनी महत्व दिल्याने त्याचा शेतकरी वर्गाला खूप मोठा फायदा झाला आहे, एवढचं नव्हे तर आमदार डॉ. अनिल बोन्डे यांनी वॉटर कप व जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आपल्या मतदार संघात माती आडवा - पाणी जिरवा हा प्रयोग यशस्वी केला, हे विशेष.
Post a Comment