चांदूर रेल्वे / शहेजाद खान /---

सर्व शिक्षा अभियान अंतर्गत चांदूर रेल्वे तालुक्यातील ९८ जिल्हा परिषद, शासकिय व खाजगी अनुदानीत शाळेतील वर्ग १ ते ८ च्या मराठी, इंग्रजी व उर्दु माध्यमाच्या सर्व विद्याथ्र्यांना ५० हजार ९३६ पाठ्यपुस्तकांचे वाटप होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने वर्ग १ ते ८ पर्यंतच्या जिल्हा परिषद व खाजगी अनुदानित शाळेतील सर्व विद्याथ्र्यांना पाठ्यपुस्तकाचे वितरण केल्या जाते. यावर्षी वर्ग १ ते ८च्या मराठी, इंग्रजी व उर्दु माध्यमाच्या विद्याथ्र्यांना ५० हजार ९३६ पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात येणार आहे. मराठी व इंग्रजी माध्यमाच्या वर्ग १ व २च्या विद्याथ्र्यांना प्रत्येकी १०२४ संच, तिसरीच्या विद्याथ्र्यांना १०८२ संच व चवथीच्या विद्याथ्र्यांना ११११ संच व पाचवीच्या विद्याथ्र्यांना १२१४ व सहावीच्या विद्याथ्र्यांना १३०१, सातवीच्या विद्याथ्र्यांना १३४५ व आठवीच्या विद्याथ्र्यांना १३९९ असे पाठ्यपुस्तकाच्या संचचे वाटप केले जाणार आहे. उर्दु माध्यमाच्या वर्ग पहिलीकरीता ४२, दुसरीसाठी ४७, तिसरीसाठी ४० व चवथीसाठी ४१ संच, पाचवीसाठी ४०, सहावीसाठी ४० संच, सातवीसाठी ३७ व आठवीसाठी ३८ पाठ्यपुस्तक संच चे वाटप करण्यात येणार आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील सर्व शाळांना विद्यार्थी संख्येप्रमाणे पाठ्यपुस्तकांचे संच देण्याचे काम सुरू आहे. नव्या शैक्षणिक सत्रात शाळेच्या पहिल्या दिवशी २७ जुन ला सर्व शाळेतील विद्याथ्र्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे.गटशिक्षणाधिकारी अशोक इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी (शिक्षण) आशा लामसे, विषय तज्ज्ञ मंगेश उल्हे, वैâलाश शहारे, मंगेश पवार, विजय दवाळे पाठ्यपुस्तकाच्या वितरणासाठी परिश्रम घेत आहे.
Post a Comment