BREAKING NEWS

Sunday, June 5, 2016

गृहराज्यमंत्री रणजित पाटील समोर भाजप कार्यकत्र्यांचा तक्रारीचा पाढा स्थानिक विश्रामगृहात पार पडली बैठक


चांदूर रेल्वे/ शहेजाद खान /--         



 
निवडणूकीच्या वेळी मतांचा जोगवा मागण्यासाठी पक्ष कार्यकत्र्यांना मतदारांकडे जावे लागले.निवडून आल्यावर मात्र मतदारांची कामे होत नाही. त्यामूळे मतदारांकडे कोणत्या तोंडाने पुन्हा मत मागण्यासाठी जावे अश्या स्पष्ट शब्दात भाजपा कार्यकत्र्यांनी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांना स्थानिक
विश्रामगृहात आयोजित बैठकीत खडे बोल सुनावले.
या बैठकीला माजी आ.अरूण अडसड, चांदूर रेल्वे पं.स.सभापती अ‍ॅड.किशोर झाडे, उपसभापती देविका राठोड, भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र उपाध्ये, उत्तमराव ठाकरे, नगर सेवक शंकर मानकानी आदी मान्यवर उपस्थित होते. जेष्ठ कार्यकर्ते उत्तम ठाकरे यांनी चांदूर रेल्वे नगरपालीकेवर भाजपाची सत्ता आल्यानंतर सत्काराच्या कार्यक्रमाच्यावेळी राज्यमंत्री पाटील यांनी न.प.ला निधी देण्याचे आश्वासन पाळले नाही. दोन बंडखोर नगरसेवकावर कारवाईत कुचराई दाखविली. तीच स्थिती एलईडी स्ट्रीट लाईट व घरकुल घोटाळ्यातील दोषीच्या कारवाईत बघ्याची भूमिका घेतली.भाजप कार्यकत्र्यांची महत्वाची कामे होत नसल्यामूळे का म्हणून कार्यकत्र्यांनी पक्ष व पदवीधर नोंदनी का करावी असा प्रश्न उपस्थित केला. मुन्ना मुंधडा यांनी पं.स.अधिकारी आमचे ऐकत नाही. तर अजय हजारे यांनी तालुक्यातील विविध समित्याचे गठन व आढावा सभा झाले नसल्याचे सांगीतले. अनिल वानखडे यांनी एका लाखासाठी शेतकरी कर्ज पुनर्गठनासाठी बँक सर्च रिपोर्ट मागत असल्यामूळे कर्ज कसे घ्यावे हा प्रश्न मांडला. अनेकांनी समस्या मांडल्या. माजी आ.अरूण अडसड यांनी पदवीधर निवडणूकीच्या वेळी बि.टी.देशमुख पडु शकत नसतांना कार्यकत्र्यांनी जीव तोडून काम केले. त्यामूळे पक्षांची बांधणी करीत रहा.पक्षाचा माणुस असला पाहीजे. यासाठी पदवीधर, जिल्हा परिषद, पंचायत समितीवर भाजपची सत्ता कशी येईल यांचा चंग प्रत्येकांनी बांधला पाहीजे. सत्ता आल्यामूळे अपेक्षा वाढल्या. समित्यावर निवड झाली नाही म्हणून नाराज न होवू नका असे सात्वंन कार्यकत्र्यांचे केले. गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी भाजपाची सत्ता नसतांना व एकमेव आमदार असतांना पक्षादेशानुसार अमरावतीसाठी ३ कोटी व यवतमाळ निवडणूकीसाठी कोटी रूपये दिले. आता ४-४ आमदार आहेत. पदवीधर मतदार संघात ५ जिल्हे असुन ५६ तालुक्ये आहेत. सर्वांना समप्रमाणात विकास निधी वाटला तरी एकाच्या वाट्याला केवळ ७ लाख येतील. महाराष्ट्रात भाजप सत्तेत येताच खात्याच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्याला सर्वात जास्त निधी मिळवून दिला. नगरपालीकेला दिलेला विकास निधी सत्ताधारी पक्ष नगरसेवकाच्या वार्डात वापरत नसल्यामूळे तसा कायद्यात बदल केला. आता आम्ही दिलेला पैसा आमच्या पीडब्ल्युडी मार्पâत आपल्या वार्डात वापरता येईल. अंशकालीन पदवीधरांची यादी व वयाची मर्यादा वाढवली.त्यांना राज्यात सुरू असलेल्या मोठ्या प्रकल्पात नोकरी देण्याचे काम शासन करीत असल्याचे डॉ.पाटील यांनी सांगीतले. यावेळी लता बागडे यांनी भाजपात प्रवेश घेतला. बैठकीला नगरसेविका प्रमिल गणेडीवाल, छोटू विश्वकर्मा, वासुदेव मानकानी, अ‍ॅड.राजीव अंबापुरे, बबन गावंडे, गुड्डू बजाज, किशोर क्षीरसागर, संतोष राठोड, पराग मेंढे, गोपाळ गणेडीवाल, प्रशांत कांबळे, बंडु गावंडे, राजु सोळंके, गजानन गिरी, प्रशांत देशमुख सह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

chandur Relwe News

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.