खोटे वृत्त प्रसारित करणार्या वृत्तवाहिनीच्या विरोधात कायदेशीर
मार्गाने लढा देणार्या साधिकेचे अभिनंदन !
सनातनच्या साधिका सौ. श्रद्धा पवार यांना अटक केल्याचे खोटे वृत्त प्रसारित
करून तिची अपकीर्ती करणार्या जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा जाहीर खुलासा
मुंबई - पानसरे हत्याप्रकरणी सनातनची साधिका श्रद्धा पवार
अटकेत, असे एकांगी, खोटे आणि खोडसाळ वृत्त सातत्याने प्रसारित करून
वैयक्तिक अपकीर्ती केल्याविषयी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, वृत्तवाहिनीचे
संपादक आणि वृत्तवाहिनीचे संचालक यांच्या विरोधात सनातनच्या साधिका सौ.
श्रद्धा पवार यांनी अधिवक्त्या सौ. अस्मिता सोवनी यांच्यामार्फत राजापूर
येथील दिवाणी न्यायालयात ५ लक्ष रुपयांच्या हानीभरपाईचा दावा दाखल केला
होता. या दाव्यानंतर जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने २४ जून २०१६ या दिवशी
बातमीपत्रात जाहीर खुलासा करतांना सांगितले की, अटक या शब्दाचा चुकून
उल्लेख केला. यामागे कुणाची प्रतिमा मलिन करण्याचा जय महाराष्ट्र वाहिनीचा
हेतू नव्हता.
२९ सप्टेंबर २०१५ ला दुपारी २ वाजता आणि रात्री १०.२८ वाजता
दाखवलेल्या वृत्तांमध्ये साधिका सौ. श्रद्धा पवार यांची अपकीर्ती करण्यात
आली. कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनच्या साधिका श्रद्धा पवार
गोव्यातून कह्यात, श्रद्धा पवार गोव्याच्या रामनाथी आश्रमातील साधक,
श्रद्धाच्या अटकेमुळे आरोपीची संख्या दोन झाली, समीर गायकवाड आणि श्रद्धा
पवार, अशी खोटी वृत्ते प्रसारित करण्यात आली. या खोट्या वृत्तांच्या
विरोधात सौ. श्रद्धा पवार यांनी धाडसाने त्यांच्या अधिवक्त्यांमार्फत जय
महाराष्ट्र या वृत्तवाहिनीच्या विरोधात दावा दाखल केला. या दाव्याचे समन्स
मिळताच जय महाराष्ट्र या वाहिनीने खुलासा करत बिनशर्त माफी मागितली.
Post a Comment