अहेरी :-.../ रंगय्या रेपाकवार/---

तालुका मुख्यालयापासून विस कीलोमीटर अंतरावर असलेल्या गुड्डीगुडम येथिल गंगाराम लचय्या गावतुरे या ईसमाच्या घराला अचानक लागलेल्या आगीत पुर्ण घर जळून राख झाले.घरातील सर्व वस्तू तसेच अन्न धान्य जळल्याने त्यांचे कुठूंब रस्त्यावर आले.सुमारे तिन लाखचे वर त्याचे आर्थिक नुकसान झाले आहे.
या आपतग्रस्त कुठूंबाला मदतीचा हात देण्यासाठी जि.प.गडचिरोलीचे कृषी सभापती अजय कंकडालवार हे पुढे येत त्यानी या कुठूंबाला आर्थिक मदत दिली व शासनाकडून सुध्दा आर्थिक मदत मीळवून देण्याचे आश्वासन देत आपतग्रस्त कुठूंबाला धीर दिला. यावेळी गावचे सरपंच महेश मडावी, उपसरपंच शशिकला पेंदाम,ग्रामपंचायत सदस्य इंदू पेंदाम, रंजना सडमेक, प्रफुल नागुलवार,संगीता आत्राम, सीताराम आत्राम, सुरेश भुसारी,अजय नैताम व ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment