जळगाव -
हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी (सनातन धर्म राज्य) हिंदुत्ववादी संघटनांचे राष्ट्रव्यापी संघटन उभे करण्याच्या उद्देशाने १९ जून ते २५ जून या कालावधीत गोवा राज्यात पंचम अखिल भारतीय हिंदु अधिवेशन प्रारंभ होत आहे. अधिवेशनाला भारतातील २१ राज्यांसह नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका येथील १२५ हून अधिक हिंदु संघटनांचे ४१५ हून अधिक प्रतिनिधी उपस्थित रहातील. ते हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सामायिक कृती आराखड्यांतर्गत वर्षभरातील उपक्रम आणि आंदोलनांची दिशा निश्चित करतील, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय पाटील यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस सनातन संस्थेचे पू. नंदकुमार जाधव आणि हिंदु महासभेचे अधिवक्ता गोविंद तिवारी हे उपस्थित होते.

श्री. विजय पाटील पुढे म्हणाले की, मागील ४ राष्ट्रीय अधिवेशनांत
निश्चित झाल्यानुसार जळगाव येथे पांडववाडा मुक्त करण्यासाठी आणि शिरसोली
येथील पशूवधगृह बंद करण्यासाठी, तसेच भुसावळ येथे १९ वर्षांपासून प्रलंबित
असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी, धुळे येथे
सापडलेल्या इसिसच्या हस्तकांवर कठोर कारवाई करण्याविषयी, तसेच कनोसा
कॉन्व्हेंट मध्ये हिंदु विद्यार्थ्यांना धर्माचरण करण्यास केलेल्या
बंदीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. जळगाव येथे २७ आणि २८ नोव्हेंबर २०१५
या कालावधीत स्थानिक संघटनांचे संघटन करण्यासाठी प्रांतीय हिंदू
अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले. याच कार्याला अधिक गती देण्याचा प्रयत्न या
पाचव्या अधिवेशनाद्वारे होईल.
या अधिवेशनात जळगाव येथून हिंदु महासभेचे अधिवक्ता श्री. गोविंद
तिवारी, शिवसेनेचे श्री. मोहन तिवारी, जय श्रीराम ग्रुपचे श्री. विकास
साबळे, विलास चौधरी, हिंदुत्ववादी अधिवक्ता श्री. मनीष वर्मा, नंदुरबार
येथील हिंदुत्ववादी अधिवक्ता श्री. पुरुषोत्तम जोशी आणि अधिवक्ता सौ.
अश्विनी जोशी, धुळे येथील स्वदेशी जागरण मंचचे श्री. विलास राजपूत आणि
धर्माभिमानी श्री. तुषार राजपूत हे मान्यवर सहभागी होतील.
Post a Comment