●अहेरी / रंगय्या रेपाकवार /----●
अहेरी उपक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या क्रिष्णापुर या गावात स्थानिक संयुक्त वन व्यवस्थापन समिती तथा गावकरी तर्फे एक हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे
पालकमंत्री ना राजे अम्बरीशराव आत्राम ह्याच ठिकाणी वृक्षारोपण करणार आहे त्या अनुषंगाने संयुक्त वन व्यवस्थापन समिती तथा गावकरी तर्फे 1000 खड्डे नियमानुसार तयार करून होते व ह्याच गोष्टीची तपासणी करण्यासाठी उपवनसंरक्षक हेमन्त कुमार मीना , आय एफ एस व अहेरी चे वनपरिक्षेत्र अधिकारी पियुषा जगताप , अहेरी चे क्षेत्र सहाय्यक टी चन्द्रशेखर , वनरक्षक पी एम नंदगीरवार उपक्षेत्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते
ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार ,अर्थ नियोजन व वनमंत्री यांच्या १ जुलाई रोज़ी २ कोटी वृक्ष लागवड करण्याचा महत्वाकांक्षी अभियाना अंतर्गत गावातील प्रत्येक नागरिकानी त्यांच्यात्यांच्या घरासमोरील जागेत वृक्ष लाऊन त्याचे संवर्धन करावे तसेच आपले व पूढील पीढ़ीचे जगने सुकर होऊन निसर्गाचा समतोल साधन्यात आपलाही सहभाग द्यावा अशे मार्गदर्शन उपवनसंरक्षक हेमंत कुमार मीना ह्यांनी उपस्थित गावकऱ्यांना केला
Post a Comment