जेव्हा धर्माला अधर्माचे स्वरूप प्राप्त होते, तेव्हा धर्मशास्त्रात त्याला भीषणकाळ म्हटले जाते. सध्या धर्मविरोधी शक्तींचे उदात्तीकरण होत आहे. जगभर इसिसचे संकटही वाढत आहे. त्यामुळे येणार्यार काळात धर्मनिरपेक्ष राष्ट्र कि हिंदु राष्ट्र असा नव्हे, तर इस्लामी राष्ट्र कि हिंदु राष्ट्र असा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे हिंदूंनी संघटनाच्या जोडीला संघर्षाची सिद्धता ठेवावी, असे आवाहन पू. डॉ. श्री चारुदत्त पिंगळे यांनी केले.
महाराजाधिराज महाराव रघुवीरसिंहजी बहादूर म्हणाले, जगभरात 46 इस्लामी राष्ट्रे आहेत. क्षत्रियांच्या योगदानामुळेच भारतात हिंदू शिल्लक आहेत अन्यथा भारत केव्हाच इस्लामी राष्ट्र झाले असते.
जगाच्या पाठीवर एकमेव हिंदु राष्ट्र असलेले नेपाळ तेथील नेपाळी जनतेचा विरोध डावलून धर्मनिरपेक्ष म्हणून घोषित करण्यात आले. तेथील हिंदूंचा त्यासाठी लढा चालूच असून येत्या 2 वर्षांत नेपाळला पुनश्चल हिंदु राष्ट्र बनवू, असा विश्वा स डॉ. माधव भट्टराई यांनी व्यक्त केला.
Post a Comment